🛑झाराप रेल्वेस्थानकावरून खनिजसदृश मातीची वाहतूक.
*🛑झाराप रेल्वेस्थानकावरून खनिजसदृश मातीची वाहतूक.*
*🛑अवैध मायनिंगची चौकशी करा : डॉ. जयेंद्र परुळेकरांची मागणी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध मायनिंगचे प्रकार वाढत असल्याची चर्चा सुरू असतानाच झाराप रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर खनिजसदृश मातीचे साठे जमा होत असल्याने नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.
आडाळी एमआयडीसी परिसरात रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या कथित मायनिंगच्या चर्चेची धग अद्याप कायम असतानाच झाराप रेल्वेस्थानकावर खनिजसदृश मातीचे ढिगच्या ढिग जमा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, गेल्या आठवडाभरात पाच मालगाड्या भरून ही माती गोव्यातील वास्को येथे पाठविण्यात आली आहे. याशिवाय सहावी मालगाडी भरण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे दररोज शेकडो डंपर्सद्वारे ही माती स्थानकावर आणली जात असली तरी ती नेमकी कोणत्या भागातून येते, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध होत नाही. मळेवाड-कोंडुरा परिसरातून की धाकोरा भागातून ही खनिजमाती काढली जात आहे, याबाबत संभ्रम कायम आहे. एवढ्या खनिजसंपत्ती मोठ्या प्रमाणात जिल्ह्याबाहेर पाठविली जात असताना संबंधित यंत्रणांकडून पुरेशी माहिती न मिळाल्याने संशय गडद होत आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मते, या संपूर्ण व्यवहारामागे अवैध मायनिंगचा प्रकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर उत्खनन आणि वाहतूक नियमांनुसार होत असेल तर संबंधित परवानग्या, महसूल नोंदी आणि वाहतुकीची कागदपत्रे सार्वजनिक करण्यात यावीत, अशी मागणीही पुढे येत आहे. डॉ. परुळेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. खनिकर्म, महसूल व पर्यावरण विभागाच्या माध्यमातून तातडीने चौकशी करून मातीचा उगम, उत्खननाची वैधता वाहतुकीची माहिती तपासावी, अशी आणि रेल्वेमार्फत होत असलेल्या मागणी त्यांनी केली आहे. झाराप घेण्याची विनंती प्रशासनाला केली ग्रामस्थांनीही याची गंभीर दखल असून संभाव्य अवैध मायनिंग रोखण्यासाठी त्वरित कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

