ओसरगाव येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
ओसरगाव येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
वडिलांच्या चतुर्थ स्मृतिदिनाचे निमित्त
गणेश कदम यांचा उपक्रम
प्रतिनिधी सुनील आचरेकर
कणकवली तालुक्यात ओसरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी जगन्नाथ कदम यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त ट्रॉली ,स्पीकर व शैक्षणिक साहित्याचे वाटप मनसे पदाधिकारी तथा उद्योजक गणेश कदम यांच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी गावचे सरपंच प्रमोद कावले तीन शाळांचे मुख्याध्यापक गोसावी मुख्याध्यापक दिलीप कदम मुख्याध्यापिका पावसकर ,हरमलकर ,गजानन तळेकर आप्पा देसाई, राघोजी कदम, बबन देसाई ,प्रदीप तळेकर ,भानुदास तळेकर ,भास्कर तळेकर ,शाम गवस किसन कल्याणकर सुभाष सावंत किरण पिळणकर नितीन तळेकर बाळा कावले ,अरुण परब सुमन तळेकर आदी उपस्थित होते जिल्हा परिषद शाळा ओसरगाव मळेवाडी व ओसरगाव कानसळीवाडी येथील या शाळांनी केलेल्या मागणीनुसार ट्रॉली स्पीकर देण्यात आले आहेत. तसेच ओसरगाव बौद्धवाडी प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व तेथील शाळेतील मुलांना खाऊचे वाटप गणेश कदम यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे .ओसरगाव सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या चांगल्या आरोग्याचे हेतूने हा उपक्रम कदम कुटुंबियांनी राबविला आहे .आपल्या वडिलांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त राबविलेल्या या उपक्रमाबद्दल गणेश कदम यांचे तीन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांनी व ओसरगाव ग्रामस्थांनी आभार मानून कौतुक केले आहे.
