🛑रानबांबुळीत वन्यजीव तस्करीवर एलसीबीचा मोठा घाव;तब्बल ९२ लाखांचा मुद्देमाल जप्त
*🛑रानबांबुळीत वन्यजीव तस्करीवर एलसीबीचा मोठा घाव;तब्बल ९२ लाखांचा मुद्देमाल जप्त*
*🛑दुर्मिळ खवले मांजराची १.८०० किलो खवले, सांबराची शिंगे आणि दोन मोटारसायकलींसह चौघांना अटक.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- २९:-* जिल्ह्यात वन्यजीव तस्करीचे जाळे पुन्हा एकदा उघडकीस आले असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) केलेल्या धडक कारवाईत तब्बल ९२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रानबांबुळी येथील अनावकरवाडी परिसरात सापळा रचून पोलिसांनी दुर्मिळ खवले मांजराच्या १.८०० किलो वजनाच्या खवल्यांसह सांबराची दोन शिंगे आणि दोन मोटारसायकली ताब्यात घेतल्या.
या प्रकरणी गणेश प्रदीप शिर्के (वय ३०, रा. पडवे, ता. कुडाळ), विठोबा भगवान बावळेकर (वय ८२, रा. रानबांबुळी), शंकर यशवंत तारापूरे (वय ३१, रा. पडवे) आणि कालिदास दत्तात्रय वारंग (वय ५५, रा. सुकळवड, ता. मालवण) या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दिनांक २९ मे २०२६ रोजी सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या खवले मांजराच्या खवल्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असल्याचे सांगितले जाते. तसेच सांबराच्या शिंगांचाही अवैध व्यापार केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणी भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कलम ९, ४४, ४९(ब), ५१ तसेच बी.एन.एस. कलम ३(५) अन्वये सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलिस उपनिरीक्षक अनिल हडळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हवालदार डॉमिनिक डिसोजा, राणे, जॅक्सन तसेच पोलीस कर्मचारी कांडर आणि समजिस्कर यांनी सहभाग घेतला.
वन्यजीवांची अवैध शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात असून, या रॅकेटमागील आणखी धागेदोरे शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

