वैभववाडी तालुक्यातील गरीब, गरजु आणि हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी : दि. ०९ अध्यात्मातुन सामाजिक, शैक्षणिक उपक्रम या संकल्पनेच्या आधारे ओम स्वामी परिवार चारीटेबल ट्रस्ट कणकवली यांच्या वतीने वैभववाडी तालुक्यातील गरीब, गरजु आणि हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यात आली.
यामध्ये आर्थिक परिस्थितीने गरीब असलेल्या, परंतु शिक्षणामध्ये हुशार असलेल्या ५ विद्यार्थ्यांना ओम स्वामी परिवार चारीटेबल ट्रस्टच्या वतीने संपुर्ण वर्षाचा शैक्षणिक खर्च देऊन दत्तक घेण्यात आले. त्याचबरोबर इतर २० मुलांना वह्या, पेन आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
ओम स्वामी परिवार चारीटेबल ट्रस्टच्या वतीने वैभववाडी येथील माधवराव पवार विद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या, परंतु कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करणाऱ्या निष्ठावंत सामाजिक कार्यकर्त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
यामध्ये गणेश गोविंद मसुरकर सामाजिक कार्यकर्ते, राजेश मोतीराम पडवळ सर्वाधिक रक्तदान शिबिरे आयोजक, अनंत संभाजी फोंडके सामाजिक कार्यकर्ते, शैलेंद्र पांडुरंग परब, रमाकांत बाळाराम यादव उपक्रमशील शेतकरी, महेश रामदास संसारे कृषी उद्योजक तथा गोपालक, भालचंद्र भिकाजी ताम्हणकर सामाजिक कार्यकर्ते, परशुराम महादेव शिरसाठ समाज सेवक यांचा ओम स्वामी परिवाराच्या वतीने शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
सामाजिक उपक्रमाच्या संकल्पनेतील वैभववाडी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन ओम स्वामी परिवार नियोजन समितीचे अध्यक्ष दिपक बेलवलकर, ओम स्वामी परिवार चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष भाई जेठे, निवृत्त पोलिस अधिकारी संदीप सरवणकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी ट्रस्टचे कार्याध्यक्ष हरिभाऊ भिसे, सचिव दादा कुडतरकर, उपाध्यक्ष हनिफ पिरखान, परेश परूळेकर, खजिनदार सौ. लीना काळसेकर, संचालक योगेश गोडवे, पुरूषोत्तम पवार, संतोष टक्के, सौ. सायली मालवणकर, सौ. स्नेहलता चोरगे, सौ. नीलम सावंत, सौ. परुळेकर, सौ. गिता कामत, राजु सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
ओम स्वामी परिवार चॅरीटेबल ट्रस्ट उपक्रमाविषयी आणि संकल्पाविषयी माहिती देण्याकरिता दीपक बेलवलकर, हरिभाऊ भिसे, दादा कुडतरकर, योगेश गोडवे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी ओम स्वामी परिवार चारीटेबल ट्रस्टच्या वैभववाडी शाखेचा शुभारंभ करण्यात आला. वैभववाडी तालुक्याची १५ जणांची समिती नियुक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी महिलांसाठी हळदी – कुंकु कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वैभववाडीमध्ये अशा प्रकारचा सामाजिक उपक्रम राबवले, आपल्याबद्दल समस्त वैभववाडी करांच्या वतीने संतोष टक्के यांनी आभार व्यक्त केले.
💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥
💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥
🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥
🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

