🛑आडाळी एमआयडीसीतील माती उत्खनन प्रकरणाची उद्योगमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल.*श
*🛑आडाळी एमआयडीसीतील माती उत्खनन प्रकरणाची उद्योगमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- २९:-* आडाळी एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात खनिजयुक्त मातीचे बेकायदेशीर उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या वृत्तानंतर शिंदे शिवसेना शिष्टमंडळाने घटनास्थळी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला असून दोडामार्ग शिवसेना शिष्टमंडळाला शनिवारी रत्नागिरी येथे बैठकीसाठी बोलावले आहे.
आडाळी एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर मायनिंग माती उत्खननाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर माती काढून नेण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचा दावा शिवसेना शिष्टमंडळाने केला.
यावेळी पंचायत समिती उपसभापती तथा शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत संपूर्ण घडामोडींची माहिती दिली. यावेळी मंत्री सामंत यांनी, “या संदर्भात स्थानिक अधिकारी वर्गाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती,” असे सांगत या प्रकरणी शनिवारी रत्नागिरी येथे बैठक आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केल्याची माहिती गवस यांनी दिली.
“या अवैध माती उत्खननाशी अथवा तस्करीशी शिंदे शिवसेनेचा कोणताही संबंध नाही. उलट अशा बेकायदेशीर प्रकारांविरोधात कठोर भूमिका घेत कारवाईसाठी पाठपुरावा केला जाईल,” असेही गणेशप्रसाद गवस यांनी स्पष्ट केले.
*महसूल प्रशासनावर सवाल*
आडाळी एमआयडीसी परिसरात बेकायदेशीर उत्खनन आणि माती वाहतूक सुरू असताना संबंधित महसूल प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले का? असा सवाल उपस्थित करत गणेशप्रसाद गवस यांनी प्रशासनावर टीका केली. “प्रशासनाचा वचक राहिला नसल्यामुळेच असे प्रकार वाढत आहेत. एमआयडीसीमध्ये उद्योगांच्या नावाखाली चुकीचे प्रकार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भातील सर्व पुरावे आणि अहवाल उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सादर करण्यात येणार आहेत,” असे त्यांनी सांगितले.
या पाहणीवेळी उपजिल्हा प्रमुख राजेंद्र निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य साक्षी तळवडेकर, पंचायत समिती सदस्य स्नेहा गवस, उपतालुका प्रमुख बाबाजी देसाई, युवा सेना तालुका प्रमुख भगवान गवस, रामदास मेस्त्री, विभाग प्रमुख मणेरी-झरेबाबर सरपंच अनिल शेटकर, पिकुळे सरपंच आप्पा गवस, विशांत तळवडेकर, माजी सरपंच गुरुदास सावंत, ग्रामपंचायत सदस्य सासोली, उपसरपंच सुनील गवस (मांगेली) आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

