🛑सिंधुदुर्गात उभारला जाणार ४० कोटींचा अत्याधुनिक काजू प्रकल्प.
*🛑सिंधुदुर्गात उभारला जाणार ४० कोटींचा अत्याधुनिक काजू प्रकल्प.*
*🛑GI मानांकन,निर्यात केंद्र, प्रक्रिया उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी मोठी संधी; महाराष्ट्र राज्य काजू परिषदेची महत्त्वाकांक्षी योजना.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ला, दि- २८:-* महाराष्ट्र राज्य काजू परिषद, वेंगुर्ला यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गसह पालघर, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक काजू निर्यात केंद्र, प्रक्रिया प्रकल्प, गोदामे आणि इतर पायाभूत सुविधांसह मध्यवर्ती सुविधा केंद्र उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाकडून आवश्यक किमान २५ एकर जागा उपलब्ध करून घेण्यासाठी कार्यवाही सुरू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही शासकीय जागेवर हा प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील हलकर्णी MIDC परिसरात मंजूर झालेल्या धर्तीवरच सिंधुदुर्गमध्येही हा अत्याधुनिक प्रकल्प साकारला जाणार आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील विद्यमान काजू प्रक्रिया उद्योगांना कोणतीही बाधा न आणता उलट त्यांना अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाची रचना करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील काजू कारखानदार, प्रक्रिया उद्योजक आणि उत्पादक शेतकऱ्यांच्या सूचना विचारात घेण्यात येत आहेत.
सिंधुदुर्गच्या GI मानांकन प्राप्त काजूला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र “सिंधुदुर्ग ब्रॅण्ड” विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नव्या जातींची काजू लागवड, आधुनिक प्रक्रिया तंत्रज्ञान आणि निर्यातक्षम उत्पादन यावर भर दिला जाणार आहे. AI Technology च्या माध्यमातून जिल्ह्यात २० क्लस्टर्स विकसित करण्यात येणार असून बारामती कृषी विज्ञान केंद्र तसेच बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि तांत्रिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नाम. श्री. नितेशजी राणे यांच्या पुढाकारातून कामाला गती मिळाली आहे. यासोबतच ओल्या काजूगर प्रक्रिया उद्योगांना चालना देऊन शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवून देण्याचा निर्णयही महाराष्ट्र राज्य काजू परिषदेने घेतला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादन, प्रक्रिया आणि निर्यात या सर्व प्रक्रिया जिल्ह्याच्याच कार्यक्षेत्रातून करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक काजू उद्योगांना मोठे पाठबळ मिळणार असून युवकांसाठी रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. मध्यवर्ती सुविधा केंद्र उभारणीसाठी शासन सुमारे ४० कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नांदगाव येथे उभारण्यात येणाऱ्या बाजार आवारातही काजू सुविधा केंद्र उभारले जाणार आहे. जिल्ह्यातील काजू उत्पादक, प्रक्रिया उद्योगधारक आणि उद्योजक यांच्या सर्व सूचना राज्याचे पणनमंत्री मा. नाम. श्री. जयकुमारजी रावल यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आल्याने अनेक सकारात्मक निर्णय प्रक्रियेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याशिवाय, जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या माध्यमातून काजू खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी किमान २० सहकारी संस्थांना गोदाम उभारणी आणि खरेदी केंद्रासाठी अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होणार असून काजू उत्पादनापासून निर्यातीपर्यंतची संपूर्ण साखळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातच सक्षमपणे उभी राहणार आहे.
अशी माहिती महाराष्ट्र राज्य काजू परिषदेचे तज्ञ संचालक श्री. मनीष दळवी यांनी दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

