◾ उमेद, चैतन्य ग्राम संघ आणि शिवसेना सावंतवाडी महिला आघाडी यांच्या वतीने निरामय केंद्रात महिला दिन साजरा..
◾ यावेळी करण्यात आले महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी दि.०९-: उमेद, चैतन्य ग्राम संघ आणि शिवसेना सावंतवाडी महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोलगाव येथील निरामय विकास केंद्रात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी खेळ पैठणीचा हा आगळा वेगळा कार्यक्रम देखील घेण्यात आला आहे. कै. सौ. सोनल विक्रांत सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे पती सावंतवाडी शिवसेना विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांनी पैठणी साड्या या स्पर्धेसाठी पुरस्कृत करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेत सौ. स्वप्ना गावडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांकाची मानकरी सौ. वर्षा साळवी ठरल्या आहेत. तर तृतीय क्रमांकाच्या मानकरी सौ. पुनम नाईक ठरल्या आहेत. तर उत्तेजनार्थ पारितोषिक सौ. दीपिका राऊळ आणि सौ. निकिता साटेलकर यांनी प्राप्त केला आहे. तर यावेळी घेण्यात आलेल्या गोड नाचणी पासून बनवायच्या पाककला स्पर्धेत रश्मी चिंदरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
मधु कवठणकर यांनी द्वितीय तर मारिया डिमेलो यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर उत्तेजनार्थ पारितोषिक वैदेही राऊळ आणि दीपिका राऊळ यांनी पटकावला आहे. या स्पर्धेचे परीक्षण अलका माने व डॉ. वैशाली पडते यांनी केले होते. यावेळी कोरोना काळात सेवा देणाऱ्या आशाताई, अंगणवाड्या सेविका, यांचा सत्कार शिवसेना महिला तालुका प्रमुख अपर्णा कोठावळे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन देखील केले आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग यांनी देखील शुभेच्छा दिल्या होत्या.

