🛑विक्रांत सावंत यांचा उद्या वाढदिवस सोहळा.
*🛑विक्रांत सावंत यांचा उद्या वाढदिवस सोहळा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २७:-* भाजपचे युवा नेते,माजगाव जिल्हा परिषद सदस्य तथा सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या शिक्षणप्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांचा वाढदिवस २८ मे रोजी होत आहे. याचे औचित्य साधून त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्यावतीने २७ व २८ मे या दोन दिवशी विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आरोग्य शिबिरे, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांसाठी मदतीचा हात, गरजूंना वस्तूंनी मदत आणि मनोरंजनाचे सांस्कृतिक, दशावतार कार्यक्रम माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सहाही गावांत आयोजित केले आहेत. सावंतवाडी, दोडामार्ग रुग्णालयात वस्तूंचे वाटप होणार आहे, अशी माहिती महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
समाजसेवेचे व्रत अंगीकारुन राजकारण, समाजकारण, शिक्षणक्षेत्रात विक्रांत सावंत यांनी सुरुवात केली आहे. गेली दोन दशके ते सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. तीन महिन्यांपूर्वीच माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी होत ते जिल्हा परिषद सदस्य झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण व कृषी समितीवर सदस्य म्हणून त्यांची निवड झाली आहे. वर्षभर सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. परंतु त्यांचे चाहते, मित्रमंडळ व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या आग्रहाखातर माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघ सावंतवाडी, दोडामार्ग या दोन भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, २७ मे रोजी रात्री दशावतार नाटक आयोजित करण्यात आले आहे. रात्री १२ वाजता ओटवणे हायस्कूलच्या पटांगणावर केक कापून मित्रमंडळाच्यावतीने वाढदिवस व सत्कार केला जाईल. वाढदिवसादिवशी, म्हणजेच २८ मे रोजी दिवसभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये सरमळे येथील रमाईनगर येथे चार हायस्पीड फॅनचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर माजगावात कै. विकास सावंत यांच्या निवासस्थानी, येथील विक्रांत सावंत यांच्या निवासस्थानी ‘लॉरेन्स अँड मेयो” यांच्या सहकार्याने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील २५ गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप केले जाणार आहे.
दोडामार्ग रुग्णालयातील उपजिल्हा महिला सुतिकागृहासाठी इंडक्शन मशीन आणि सात लीटरचा थर्मास भेट म्हणून दिला जाणार आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे व जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यासोबतच, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठीदेखील उपयुक्त भेटवस्तू दिल्या जाणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे. वाढदिवसादिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. वेत्ये येथील कलेश्वर पूर्वदिवी मंदिरात रात्री ८.३० वाजता ‘राजा शिवाजी हा ऐतिहासिक सिनेमा दाखविण्यात येणार आहे. सोनुर्ली येथे रात्री १० वाजता कुळघर रंगमंच येथे दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थित राहवे, असे आवाहन विक्रांत सावंत यांच्या मित्रपरिवाराकडून व माजगाव जिल्हा परिषद विभागातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षणप्रसारक मंडळाचे सर्व संचालक मंडळ, नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानने केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

