🛑चौकशी पूर्ण होईपर्यंत निवृत्तीवेतन देऊ नये !
*🛑चौकशी पूर्ण होईपर्यंत निवृत्तीवेतन देऊ नये !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- २५:-* तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत जि. प. सीईओ रवींद्र खेबुडकर यांनी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते, यावर सुनावणी सुरू आहे. सुनावणीचा अंतिम निकाल लागेपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांची निवृत्तीपर देयके मंजूर करू नयेत, अशी मागणी प्रगत सिंधुदुर्ग मुंबई संस्थेचे अध्यक्ष दयानंद चौधरी यांनी केली आहे.
उभादांडा(वेंगुर्ले),जांभवडे(कुडाळ) ग्रा.पं.तील आर्थिक अनियमितता व कारभारातील गैरप्रकारांच्या चौकशीसाठी सीईओंनी तत्कालीन बीडिओंची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. दोन्ही चौकशा तातडीने पूर्ण करण्यासाठी मुदत देऊन चार वेळा पत्रव्यवहार केला होता. मात्र,उभादांडा ग्रा.पं.ची चौकशी पूर्ण करण्यासाठी तब्बल २८२ दिवस, जांभवडे ग्रा.पं.ची चौकशी पूर्ण करण्यासाठी ५५८ दिवस लागल्याचा आरोप चौधरींनी केला. विलंबामुळे या ग्रा.पं.ना बरखास्ती व आर्थिक वसुलीच्या कारवाईपासून वाचविल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासकीय अधिकारी दत्ता गायकवाड यांनी निवृत्तीपूर्वी या प्रकरणात केवळ समज देण्याची टिपणी केली होती.नंतर तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांच्या माध्यमातून प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उदय पाटील यांच्या सहीने तत्कालीन बीडिओंना निर्दोष मुक्त करण्यात आल्याचेही चौधरी यांनी म्हटले आहे.
या निर्दोष मुक्तीवर आक्षेप घेत चौधरी यांनी पुन्हा सीईओंकडे तक्रार दाखल केली.नंतर त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली.या नोटिशीवरील खुलासा चुकीचा असल्याचे निदर्शनास आणून देत चौधरी यांनी याची माहिती पालकमंत्री नीतेश राणे यांनाही दिली होती.नंतर या प्रकरणाच्या चौकशीस गती मिळाली.जानेवारीपासून सुनावणीच्या सहा तारखा दिल्याचे चौधरी यांनी सांगितले. मात्र, नोटिसा सुनावणीच्या एक-दोन दिवस आधी मिळाल्याने काही तारखांना उपस्थित राहणे शक्य झाले नाही. ६ एप्रिलच्या सुनावणीची नोटीस ७ रोजी मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

