कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑सतर्क एसटी चालकामुळे सोनसाखळी चोरीचा प्रयत्न फसला.

*🛑सतर्क एसटी चालकामुळे सोनसाखळी चोरीचा प्रयत्न फसला.*

 

*🛑नेरूरचे प्रशांत गावडे यांची प्रसंगावधानता;परप्रांतीय संशयित पोलिसांच्या ताब्यात, भाजपकडून सत्कार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- २०:-* कुडाळ बसस्थानकात मंगळवारी दुपारी घडलेल्या एका धाडसी आणि सतर्कतेच्या घटनेमुळे संभाव्य सोनसाखळी चोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. नेरूर येथील एसटी चालक प्रशांत महादेव गावडे यांनी प्रसंगावधान राखत एका युवतीची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय संशयित इसमाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्या या धाडसी कामगिरीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सुमारे २.२० वाजण्याच्या सुमारास कुडाळ – मालवण एसटी बस फलाटावर लागली असताना बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत एका संशयित इसमाने बसमध्ये चढणाऱ्या एका युवतीच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न केला.

ही बाब त्याचवेळी बाजूला उभी असलेल्या कुडाळ – पणजी बसचे चालक प्रशांत गावडे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बसमधून खाली उतरून त्या संशयित इसमाला हटकले. सुरुवातीला त्या इसमाने “मी काही केले नाही” अशी भूमिका घेतली. मात्र संबंधित युवतीनेही गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट सांगितले.

प्रशांत गावडे यांनी तत्काळ कुडाळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित इसमाला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली. संबंधित युवतीनेही पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली.

दरम्यान, प्रशांत गावडे यांच्या धाडसाचे आणि सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ कार्यकर्ते राजू राऊळ व उपसभापती तुकाराम तेली यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

या प्रसंगी जेष्ठ कार्यकर्ता सेलचे जिल्हा संयोजक निलेश तेंडुलकर, सेवाशक्ती एसटी कर्मचारी संघटनेचे कुडाळ आगार अध्यक्ष जयेश चिंचळकर, जिल्हा कोषाध्यक्ष चारुदत्त देसाई, तेंडोली पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू, एसटी वाहक दिनेश शिरवळकर, नगरसेवक सचिन काळप, नगरसेवक निलेश परब, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, मुक्ती परब, श्रावण शिरसाठ व शशिकांत आरोलकर आदी उपस्थित होते.

*नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज*

बसस्थानक, बाजारपेठ, यात्रा-जत्रा अशा गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या दागिन्यांवर चोरट्यांची नजर असते. त्यामुळे प्रवासादरम्यान नागरिकांनी सतर्क राहणे, संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देणे आणि अशा प्रसंगी धाडसाने पुढे येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे ही काळाची गरज असल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!