कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग च्या वतीने सर्जेकोट किल्ला स्वच्छता मोहीम.. 

 

 ◾ मोहिमेत दुर्ग सेवक आणि शिवप्रेमी झाले सहभागी… 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : राहुल गायकवाड

🎴सावंतवाडी दि.०८-:  सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभागाच्यावतीने आयोजित, सर्जेकोट किल्ला स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत दुर्गसेवक आणि शिवप्रेमी सहभागी झाले होते.

सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभागाच्यावतीने गड किल्ल्यांच्या संवर्धनाचे जे व्रत हाती घेतले आहे, त्याचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

यात तटावरील झाडी साफ करण्यात आली. तटबंदीचे दगड उचलून ठेवण्यात आले. तसेच येथील शिवकालीन विहिरीतील गाळ काढण्यात आला. या किल्ल्याची स्वच्छता करतेवेळी जमा झालेल्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. या मोहिमेत सहभागी झालेल्या दुर्गसेवक आणि शिवप्रेमी यांचे सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभागाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड किल्ले बांधले, राखले त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे, त्यासाठी जनतेने हे कार्य करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभागकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!