कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑डोंगरपाल येथे माऊली पंचायतन पुनःप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात.

*🛑डोंगरपाल येथे माऊली पंचायतन पुनःप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- १५:-* सावंतवाडी तालुक्यातील डोंगरपाल येथील श्री देवी माऊली परिवार पंचायतन देवतांच्या पुनः प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.दि.९ मे १३ अशा पाच दिवस चाललेल्या या भव्य सोहळ्यानिमित्त विविध धामिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.या सोहळ्यादरम्यान संपूर्ण डोंगरपाल गावात चैतन्यमय उत्सवाचे वातावरणात होते. रस्त्यावर उभारलेल्या प्रवेश द्वार कमानीपासून ते मंदिरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा पताकांची सजावट करण्यात आली होती.मंदिरात व बाहेर फुलांची आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात आली होती.

या सोहळ्याचे पुरोहित व मार्गदर्शक वे.शा. सं.शिवराम (राजू) रमेश नातू (आरोस) व सहकारी,देवस्थान मार्गदर्शक अरुण सोनू सावंत-मोर्ये (बांदा) व मनोहर रामचंद्र गवस (झोळंबे),डोंगरपालचे गाव पुरोहित आनंद प्रभाकर महाबळ आदींच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा झाला.

शनिवारी सकाळी पंचगव्य होम,कुष्मांड होम, विष्णू पूजन, पंचगव्य प्राशन, गणपती पूजन, देवता प्रार्थना, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदी श्राध्द, ब्राह्मण पूजन, संभारदान इत्यादी विधी होऊन सोहळा आरंभ झाला.

रविवारी गणपती पूजन,पुण्याहवाचन,मातृका पूजन,देवानांदीश्राध्द,आचार्यादिवरण,मंडप प्रवेश,कौतुकबंधन,मंडपप्रतिष्ठा,देवता जलाधिवास, जलाधिवास सुक्त पठण इत्यादी विधी झाले.सोमवारी प्राकार शुध्दी,शांतीपाठ,देवता स्नानविधी,देवता शय्याधिवास,यज्ञमंडपांतर्गत देवता स्थापना,अग्निस्थापना,ग्रहमंडल स्थापना,अन्वाधान, वास्तुपूजन, ग्रहयज्ञ इत्यादी विधी झाले. मंगळवारी प्राकारशुध्दी,शांतीपाठ,आवाहित देवता पूजन,पर्याय होम,तत्वहोम (लघुपूर्णाहुती) इत्यादी विधी झाले.

बुधवारी सकाळी प्राकारशुध्दी, शांतीपाठ, आवाहित देवतापूजन करून शिमधाडे डिंगणे,मोरगांव,आडाळी, फोंडये,नेतर्डे, कडशी मोपा, तोरसे व डोंगरपाल गावचे मानकरी, देवस्थान मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत सकाळी १० वा. १९ मिनिटे या शुभमुहूर्तावर जगतजननी सहपरिवार माऊली परमेश्वरीची पुनः प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी देवता प्रतिष्ठा मंगलाष्टके,देवता तत्वन्यास,प्राणप्रतिष्ठा,महापूजन,पूजांगहोम,उत्तरांगहोम,बलिदान,पूर्णाहूती,अग्निपूजन,विभूतीधारण,अभिषेक, महानैवेद्य आदी विधीनंतर महाआरती करून गाऱ्हाणे घालण्यात आले व महाप्रसादास आरंभ झाला.

त्यानंतर दर्शन व ऒटी भरण्यास प्रारंभ झाला.हजारो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान समिती,सर्व मानकरी आणि डोंगरपाल ग्रामस्थांच्यावतीने या सोहळ्याचे सुंदर नियोजन करण्यात आले होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!