कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ पाय घसरुन नदीत पडून इन्सुलीतील कुडवटेंब येथील वृद्धाचा मृत्यू

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-०६-: इन्सुली कुडवटेंब येथील अमृत सखाराम सावंत (८०) हे वृद्ध पाय घसरुन तेरेखोल नदीपात्रात बुडाले. तुळसाण पुलाच्या खाली असलेल्या बंधाऱ्याच्या खालच्या दिशेने ते कोसळले. याबाबतची माहिती मिळताच भाजपचे कार्यकर्ते विकी केरकर यांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांना रुग्णवाहिकेने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहे. बांदा वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना आज रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. बांदा पोलीसात याबाबत फिर्याद देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!