◾ मळगावातील अष्टपैलू खेळाडू रंजन केणी व शेखर राऊळ यांचा घरवडकर श्रीफळ पुनप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने सत्कार
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रभाकर गावडे
🎴सावंतवाडी दि.०६-: मळगाव येथील अष्टपैलू खेळाडू रंजन लवू केणी व शेखर राऊळ यांचा माळीच्या घराच्यावतीने घरवडकर श्रीफळ पुनप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.
सावंतवाडी येथे पार पडलेल्या नगराध्यक्ष चषक स्पर्धेत रंजन केणी याने एलएसएस नेमळे संघातून खेळी केली होती. प्रत्येक सामन्यात त्याने आपल्या अष्टपैलू खेळीने नेमळे संघाला अंतीम विजेतेपद मिळवून दिले. या स्पर्धेत त्याने मालिकवीर किताबही पटकाविला होता.
शेखर राऊळ याने सिंहगड करंडक स्पर्धेत शिरसाट ब्रदर्स पुणे संघातून खेळी केली होती. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव शेखर याची पुणे संघातून निवड झाली होती. मळगावातील या दोन्ही अष्टपैलू खेळाडूंचा घरवडकर श्रीफळ पुनप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने माळीच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून सत्कार कारण्यात आला.

