🛑पिग्मी एजंटांच्या कमिशन कपातीवर संताप; ३% कमिशन पूर्ववत करण्याची मागणी.
*🛑पिग्मी एजंटांच्या कमिशन कपातीवर संताप; ३% कमिशन पूर्ववत करण्याची मागणी.*
*🛑२.५% मर्यादेमुळे राज्यभर असंतोष; सिंधुदुर्गात २३-२४ मे रोजी अधिवेशनात मोठा निर्णय अपेक्षित.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* पतसंस्थांमधील दैनंदिन बचत (पिग्मी) ठेव गोळा करणाऱ्या एजंटांच्या कमिशनमध्ये कपात करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात राज्यभर असंतोषाची लाट उसळली आहे. पारंपरिकरित्या ३% कमिशनवर काम करणाऱ्या एजंटांना आता २.५% ची मर्यादा घालण्यात आल्याने त्यांच्या उदरनिर्वाहावर मोठा परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
गेल्या ४० ते ५० वर्षांपासून राज्यातील बहुतांश पतसंस्थांमध्ये ३% कमिशनची पद्धत सुरु आहे. मात्र, शासनाने नव्याने तयार केलेल्या आदर्श उपविधीमध्ये २.५% पेक्षा जास्त कमिशन देऊ नये, असे निर्देश दिल्याने पिग्मी एजंटांमध्ये नाराजी पसरली आहे. याबाबत अनेक ठिकाणी आंदोलनाची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
राज्यात सुमारे एक लाखांहून अधिक एजंट उन्हात-पावसात मेहनत करून दैनंदिन बचत गोळा करत आहेत. या कमिशनवरच त्यांचा संसार चालतो. अनेकांनी घर, वाहन, शिक्षणासाठी कर्ज घेतले असून त्याचे हफ्तेही याच उत्पन्नातून फेडले जातात. अशा परिस्थितीत कमिशन कपात झाल्यास त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवू शकते.
यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी सांगितले की, “या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन ३% कमिशन पूर्ववत ठेवण्याची मागणी राज्य स्तरावर करण्यात येणार आहे. विविध जिल्हा फेडरेशनही यासाठी प्रयत्नशील आहेत.”
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांचे अधिवेशन २३ व २४ मे २०२६ रोजी आंबोली येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे व दीपक केसरकर यांना निमंत्रित करण्यात आले असून शासन स्तरावर हा प्रश्न मांडण्यात येणार आहे.
या अधिवेशनात विविध ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

