गोठवेवाडी येथे देवी तुळजाभवानी माता गोंधळ उत्सवाचे आयोजन
गोठवेवाडी येथे देवी तुळजाभवानी माता गोंधळ उत्सवाचे आयोजन
सावंतवाडी, ता. २ : समस्त शिर्के परिवार, गोठेवाडी यांच्या वतीने देवी तुळजाभवानी मातांचा गोंधळ उत्सव मोठ्या भक्तीभावात रविवारी, दि. ३ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा धार्मिक सोहळा मदन लक्ष्मण शिर्के यांच्या निवासस्थानी सायंकाळी ७ वाजता सुरू होणार असून परिसरातील भाविकांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ६ वाजता जोगवा मागण्याने होणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता भवानी मातेचा मांड मांडणी, रात्री ८.३० वाजता गोंधळ दिवटी पेटविणे, रात्री ९ ते १२ या वेळेत महाप्रसाद, रात्री ११ वाजता जागर तसेच रात्री १२ वाजता कथा वाचन आणि देवीची गाणी असा धार्मिक कार्यक्रमांचा क्रम राहणार आहे.या उत्सवाच्या माध्यमातून देवीभक्तांना एकत्र येऊन पारंपरिक धार्मिक विधी अनुभवण्याची संधी मिळणार असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. आयोजकांनी सर्व भाविकांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

