◾ बांदा ग्रामपंचायती चे काम हे आदर्शवत व उपक्रमशील ;संजय पाटील

 

◾ सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचा चांगला पायंडा..

🖥️ Kokan Live Braking News

✍️प्रतिनिधी:शैलेश गवस

    🎴बांदा, दि-०५:- बांदा ग्रामपंचायतीचे काम हे आदर्शवत व उपक्रमशील आहे. कोणतेही राजकारण न करता सरपंच अक्रम खान व सर्व सदस्यांना एकत्रित घेत करत असलेले काम हे कौतुकास्पद आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना व विकास काय असतो हे बांद्यात आल्यावर समजते. बांदा शहर हे ‘विकासाचे रोल मॉडेल’ असल्याचे गौरवोद्गार भादवण (ता. आजरा, जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतीचे सरपंच संजय पाटील यांनी येथे काढले.

भादवण ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामविस्तार अधिकारी येथील विकासकामांची पाहणी करण्यासाठी प्रशासकीय अभ्यास दौऱ्यासाठी आले होते. यावेळी येथील नाविन्यपूर्ण संकल्पना व भविष्यातील प्रस्तावित विकासकामांच्या संकल्पना पाहून आपण भारावून गेल्याचे श्री पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी भादवण उपसरपंच दयानंद पाटील, सदस्य संजय गाडे, बाळासाहेब कुंभार, अंकुश खवरे, जयवंत देसाई, छाया देसाई, सुनंदा कुंभार, बेबी लोहार, सुनंदा पाटील, ग्रामविकास अधिकारी राजन दड्डीकर, ग्रामपंचायत कर्मचारी काशीनाथ कुंभार आदी उपस्थित होते.

यावेळी शहरातील अद्ययावत उद्यान, विद्युत दाहिनी आदी प्रकल्पांची पाहणी करण्यात आली. शहरात प्रस्तावित असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची माहिती सरपंच खान यांनी दिली. या प्रकल्पाची पूर्ण माहिती घेण्यात आली.

मान्यवरांचे स्वागत सरपंच खान यांनी केले. यावेळी उपसरपंच हर्षद कामत, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर, जावेद खतीब, साईप्रसाद काणेकर, राजेश विरनोडकर, श्यामसुंदर मांजरेकर, अंकिता देसाई, समीक्षा सावंत, किशोरी बांदेकर, उमांगी मयेकर, ग्रामविस्तार अधिकारी डी. एस. अमृतसागर, वेंगुर्ले पंचायत समितीचे सहाय्यक लेखाधिकारी श्री. चाटे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सरपंच खान म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामपंचायती या विकासाच्या केंद्रबिंदू असतात. यासाठी कोकणातील ग्रामपंचायत प्रशासन नेहमीच अभ्यास दौऱ्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना प्राधान्य देतात. मात्र पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीने बांदा शहराची अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली ही आमच्या कामाची पोचपावती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!