कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑“सिंधुदुर्गची आरोग्य व्यवस्था ‘व्हेंटिलेटर’वर; आश्वासनांचा पाऊस, पण उपचार कधी?”

*🛑“सिंधुदुर्गची आरोग्य व्यवस्था ‘व्हेंटिलेटर’वर; आश्वासनांचा पाऊस, पण उपचार कधी?”*

 

*🛑जनता आरोग्य दरबारात उघड झाली भीषण वास्तवता – ५०% डॉक्टरांची कमतरता, ७०% आरोग्य सेवा खासगीवर अवलंबून; आमदार दीपक केसरकर यांचे सुधारणा करण्याचे आश्वासन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- ३०:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी आरोग्य यंत्रणेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, ती अक्षरशः ‘व्हेंटिलेटर’वर असल्याची धक्कादायक कबुलीच जनता आरोग्य दरबारात देण्यात आली. सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित या दरबारात माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आरोग्य यंत्रणा सुधारण्याचे आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात स्थिती किती बिकट आहे याचे भयावह चित्र उपस्थित मान्यवरांनी मांडले.

आमदार केसरकर म्हणाले, “सिंधुदुर्गला विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून रिक्त वैद्यकीय पदे भरणे, पायाभूत सुविधा सुधारणे आणि १०८ रुग्णवाहिका सेवेकडे विशेष लक्ष दिले जाईल.” मात्र याच वेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी मंजूर दोन कोटींच्या कामाची संथ गती पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कंत्राटदार लॉबीवरही थेट आरोप केला.

*आरोग्य व्यवस्थेचे उघडे पडलेले वास्तव*

डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी परिस्थितीचे अत्यंत स्पष्ट आणि कठोर चित्र मांडले. “जिल्ह्यातील ७० टक्के आरोग्य सेवा खासगी रुग्णालयांवर चालते, शासन केवळ ३० टक्के सेवा देत आहे आणि त्यातही अपयशी ठरत आहे,” असे ते म्हणाले.उपजिल्हा रुग्णालयात १९ पदे मंजूर, पण केवळ ५ डॉक्टर कार्यरत

दररोज सरासरी ६ रुग्ण गोव्याला रेफर ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी फक्त ८ ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर

जिल्ह्यात तब्बल ५०% डॉक्टरांची कमतरता“ग्रामीण जनतेला जणू गुरेढोरे समजून आरोग्य सेवा दिली जात आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केली.

*“गुरांच्या गोठ्यासारखी रुग्णालयाची अवस्था”*

जनता आरोग्य दरबाराचे समन्वयक एन. बी. रेडकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या अवस्थेवर सडकून टीका करत, “ही इमारत रुग्णालयापेक्षा गुरांचा गोठा वाटते,” असा संताप व्यक्त केला. स्वच्छता, पाणीटंचाई आणि पायाभूत सुविधांचा पूर्ण बोजवारा उडाल्याचेही त्यांनी सांगितले.नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी देखील स्वच्छता व शवविच्छेदन इमारतीच्या दुरवस्थेवर लक्ष वेधले.डॉक्टर येत नाहीत, कारणे गंभीर,अल्प पगार, अपुऱ्या सुविधा आणि अस्थिर यंत्रणा यामुळे तज्ज्ञ डॉक्टर सिंधुदुर्गकडे पाठ फिरवत आहेत. परिणामी, ग्रामीण भागात बीएएमएस डॉक्टर किंवा नर्सिंग स्टाफवरच आरोग्य सेवा अवलंबून आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी विशेष धोरणाची गरज असल्याचे आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी स्पष्ट केले.

*मागण्या काय?*

रिक्त पदे तातडीने भरणे

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर देणे,१०८ रुग्णवाहिका सेवा सक्षम करणे,बंद असलेली ‘ब्लड बँक व्हॅन’ सुरू करणे

*प्रश्न अजूनही अनुत्तरितच*

दरबारात आश्वासनांची सरबत्ती झाली, समस्या उघडकीस आल्या, पण प्रत्यक्षात बदल कधी होणार? सिंधुदुर्गकरांना आजही मूलभूत आरोग्य सेवेसाठी जिल्ह्याबाहेर धाव घ्यावी लागते, ही वस्तुस्थिती प्रशासनासाठी लाजिरवाणी नाही का?आरोग्य यंत्रणा सुधारण्याचे आश्वासन देणे सोपे आहे, पण त्याची अंमलबजावणी करण्याची खरी वेळ आता आली आहे. अन्यथा ‘जनता आरोग्य दरबार’ हे केवळ आश्वासनांचे व्यासपीठ बनून राहील, आणि सामान्य नागरिक मात्र आजारपणाशी एकटाच झुंज देत राहील.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!