कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत गाळे घोटाळ्याचा स्फोट! एकाच कुटुंबाने ९ पेक्षा जास्त गाळे अडवले? श्रेयस मुंज यांचा आरोप.

*🛑सावंतवाडीत गाळे घोटाळ्याचा स्फोट! एकाच कुटुंबाने ९ पेक्षा जास्त गाळे अडवले? श्रेयस मुंज यांचा आरोप.*

 

*🛑नगरपरिषदेकडून कारवाईचा विलंब; १ मेपासून उपोषणाचा इशारा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ३०:-* सावंतवाडी शहरात नगरपरिषदेच्या गाळ्यांबाबत गंभीर गैरव्यवहार उघडकीस येत असून, एकाच कुटुंबाकडे तब्बल ९ पेक्षा अधिक गाळे असल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. अर्जदार श्रेयस साईनाथ मुंज यांनी या प्रकरणी थेट आवाज उठवत १ मे २०२६ पासून नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.

नगरपरिषदेकडील नियमांनुसार एकाच कुटुंबास दोनपेक्षा जास्त गाळे देता येत नाहीत. मात्र, प्रसाद, विनोद आणि प्रमोद मुंज या कुटुंबियांकडे अनेक गाळे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर काही गाळे पोटभाड्याने देऊन मूळ कराराचा भंग करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

*भिंती तोडून इमारतीला धोका? सहा वर्षांचे भाडे थकीत!*

सदर गाळ्यांमध्ये भिंती व बीम तोडून इमारतीच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा गंभीर मुद्दाही समोर आला आहे. याशिवाय नगरपरिषदेचे तब्बल सहा वर्षांचे भाडे थकीत ठेवून आर्थिक नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

*गाळे ‘गोडाऊन’मध्ये; गरजू व्यापाऱ्यांना वंचित ठेवले?*

अनेक गाळे बंद ठेवून गोडाऊनसाठी वापरले जात असल्याने खऱ्या गरजू व्यावसायिकांना गाळे मिळत नसल्याचा आरोप आहे. तसेच पुनर्विकासाच्या नावाखाली जुने गाळे न सोडताच नवीन गाळे मिळवले गेल्याची बाबही उघड झाली आहे.

*१५ ते ३० लाखांत बेकायदेशीर व्यवहार?*

नगरपरिषदेचे गाळे बेकायदेशीररीत्या १५ ते ३० लाख रुपयांत विक्री केल्याचे आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच इंदिरा गांधी व्यापारी संकुल परिसरात अनधिकृत शेड उभारून वीज कनेक्शन घेऊन वापर केल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

*“मी १५ हजार भाडे देण्यास तयार, तरीही दुर्लक्ष!”*

अर्जदाराने दरमहा १५,००० रुपये भाडे देऊन गाळा घेण्याची तयारी दर्शवूनही नगरपरिषदेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

*१ मेपासून उपोषण*:

वरील सर्व मागण्यांवर तात्काळ कारवाई न झाल्यास श्रेयस मुंज हे १ मे २०२६ पासून नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आता प्रश्न एकच – नगरपरिषद जागी होणार का? की गाळे घोटाळा असाच सुरू राहणार?

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!