🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालत.
*🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालत.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि- २९:-* जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये ९ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील न्यायप्रक्रियेला गती देणे आणि सर्वसामान्य नागरिकांना जलद व परवडणाऱ्या पद्धतीने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार ही लोक अदालत आयोजित करण्यात येत असून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या वर्षातील ही दुसरी लोक अदालत असून तडजोडपात्र प्रकरणे एकाच दिवशी सामोपचाराने निकाली काढण्यावर भर दिला जाणार आहे.त्यामुळे नागरिकांना दीर्घकाळ चालणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेपासून दिलासा मिळणार आहे.
लोक अदालतीत दिवाणी व फौजदारी प्रकरणे,कौटुंबिक व वैवाहिक बाद, मोटार अपघात दावा प्रकरणे, भूसंपादन व महसुली प्रकरणे,धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणे तसेच वीज बिल व पाणीपट्टी देयकांशी संबंधित प्रकरणांचा समावेश असेल. याशिवाय बँका, वित्तीय संस्था व विमा कंपन्यांची तडजोडीस पात्र तसेच दाखलपूर्व प्रकरणेही हाताळली जाणार आहेत. लोक अदालतीची प्रक्रिया सोपी, जलद आणि अनौपचारिक असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही सहज सहभाग घेता येतो. कमी वेळेत व कमी खर्चात न्याय मिळवण्याची ही प्रभावी पद्धत असून दिलेले निर्णय अंतिम व बंधनकारक असतात. दरम्यान, निकाली निघालेल्या प्रकरणांमध्ये भरलेले न्यायालयीन शुल्क परत मिळण्याची सुविधाही उपलब्ध आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांसाठी ही योजना विशेषतः उपयुक्त ठरत असून न्यायप्रवेश सुलभ करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिक, शासकीय विभाग, बँका, वित्तीय संस्था व संबंधित पक्षकारांनी तडजोडीस पात्र प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी या लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती संपूर्णा गुंडेवाडी यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

