आणखीकोकणक्राइमरत्नागिरी

खेड तालुक्यातील कुळवंडी येथे गावठी दारू धंद्यावर राज्य उत्पादन शुल्काची धाड

▪️गावठी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रावर लाखोचा मुद्देमाल जप्त

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळुण : दि. ०५ खेड येथील कुळवंडी येथील जंगलात गावठी दारू तयार करत असलेल्या अड्ड्यावर धाड टाकून ३ लाख १७ हजार रकमेचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. हात भट्टी निर्मूलन अंतर्गत कार्यक्रम राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपाधीक्षक व्ही व्ही वैद्य यांनी जोरदार हाती घेतला असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी गावठी दारु धंद्यावर धाड सत्र सुरू आहे.

दोन दिवसापूर्वी गुहागर येथे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. आता ३ लाख १७ हजार याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कुळवंडी येथील जंगलात १२७०० रुपयाची दारू निर्मितीसाठी लागणारे लिटर रसायन व तयार हात भट्टी ची ७० लिटर दारू सापडली होती आहे.

विभागीय उपा आयुक्त वाय. एम.पवार अधीक्षक डॉ. बी.एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. व्ही. वैद्य यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक खेड,भरारी पथक व चिपळूण विभागाच्या कार्यालयाने संयुक्तपणे धाड टाकली.

दरम्यान गुहागर व खेड येथील गावठी दारू मिळून जवळ जवळ आठ ते नऊ लाखाची गावठी दारू तयार केली जात होती.दोन्ही ठिकाणी अज्ञात व्यक्ती च्या नावाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥

💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥

🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥

🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!