कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾ परमे मधिल क्रेशर च्या खडीची वाहतूक केर – शिरवल मार्गे गोव्यात; केर-शिरवल मधिल स्थानिक लोकांचा विरोध

 

◾ हा विरोध डावलून अशी वाहतूक होत असल्याने तहसीलदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी; तेथील नागरिकांची मागणी

🖥️ Kokan Live Braking News

✍️प्रतिनिधी: रामचंद्र सावंत

🎴दोडामार्ग, दि-०५:- दोडामार्ग तालुक्यातील परमे गावात असलेल्या क्रेशर मुळे केर,शिरवल,कुंब्रल,व पंतुर्ली या गावातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

ज्या रस्त्यावरून खडीची वाहतूक केली जाते तो रस्ता अरूंद आहे. तसेच त्या रस्त्याच्या आजुबाजूला मोठ्या प्रमाणावर काजूच्या बागा आहेत. रस्त्याच्या आजुबाजूला असलेल्या या काजूच्या झाडांवर खडी वाहून नेणाऱ्या डंपर च्या येण्या-जाण्या मुळे काजूच्या झाडांवर धुळीचे लोण बसून हाता तोंडाशी आलेला घास वाया जाणार आहे. तसेच शिरवल धरण व आजूबाजूचा परीसर हा पर्यटकांना मोहात टाकणारा परिसर आहे. अलिकडच्या काळामध्ये चित्रपट सृष्टीतील अभिनेते सुनील शेट्टी यांनी या परिसरात भेट दिली होती व ते या निसर्गरम्य परिसराला पाहून अतिशय मोहात पडले. तसेच शेट्टी यांच्या हितचिंतकांनी हा भाग पर्यटन दृष्टीने विकसित व्हावा यासाठी तेथे सुविधा उपलब्ध करण्यासाठी हालचाली देखील सुरू केल्या आहेत.

परंतु अश्या वाहतूकी मुळे तेथील पर्यटन देखील धोक्यात येणार आहे. तसेच हा रस्ता अरूंद असल्यामुळे तेथुन फक्त एकेरी वाहतूक होवू शकते. तसेच डंपर मुळे होणाऱ्या धुळीचे मुळे लोकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरून डंपर सारख्या अवजड वाहनांची वाहतूक होवू नये अशी मागणी केर,शिरवल,कुंब्रल,व पंतुर्ली या गावातील नागरिकांची आहे. मात्र हा विरोध डावलून अशी वाहतूक सुरू असलेल्याने तहसीलदार व वरिष्ठ अधिकारी यांनी याची दखल घ्यावी अशी मागणी त्या गावातील नागरीक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!