न्यु खासकीलवाडा हेल्थ पार्कजवळ मोबाईल टॉवर नको स्थानिक नागरिकांची मागणी
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : प्रभाकर गावडे
🎴सावंतवाडी दि. ०४ न्यु खासकीलवाडा हेल्थ पार्क जवळच कॉसमॉस बिल्डिंगच्या मागे जेसीबी लावुन, जागा सपाटीकरण करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनी चौकशी केली असता, सदरच्या जागेत मोबाईल टॉवरचे बांधकाम करण्यात असल्याचे समजले. एकीकडे नगरपालिकेने सावंतवाडीतील नागरिकांसाठी आरोग्याची काळजी घेणारे हेल्थ पार्क सारखा स्तुत्य उपक्रम सुरू केला असतानाच, अगदी त्या जागी लागुनच सर्व रहिवाशांच्या आरोग्याला घातक असा मोबाईल टॉवर उभारण्यात येत आहे.
तसेच येथेच लहान मुलांची नर्सरी स्कुल आहे. सदरच्या टॉवरमधुन होणाऱ्या रेडिएशनमुळे लहान मुलांच्या मेंदुवर आघात होण्याची दाट शक्यता आहे. सदरच्या टॉवरमुळे होणारे नुकसान आणि हानी टाळण्याकरिता सदरचा टॉवरचे बांधकाम त्वरित थांबवण्याची सुचना संबंधितांना देण्यात याव्यात. टॉवर बांधकाम परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी नागरिकाने लेखी पत्राद्वारे सावंतवाडी नगरपालिकेकडे केली आहे.
💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥
💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥
🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥
🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला

