🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी सुसज्ज निवास व सुविधा उभारणीचा संकल्प.
*🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी सुसज्ज निवास व सुविधा उभारणीचा संकल्प.*
*🛑नगराध्यक्षा श्रध्दा राजे भोसले यंचा पुढाकार.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २२:-* येथील उपजिल्हा रुग्णालयात सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी सुसज्ज शासकीय निवास व्यवस्था उभारण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प नगराध्यक्ष सौ. श्रद्धाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आला. याशिवाय रुग्णालय परिसरातील विविध भौतिक सुविधांबाबतही ठोस निर्णय घेण्यात आले.पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत पोस्टमार्टेम रुमची नवी इमारत, रुग्णालय परिसरात हायमास्ट दिवे, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी बैठक व्यवस्था उभारण्याचे निर्णय घेण्यात आले.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीने रुग्णालयातील विविध समस्यांबाबत निवेदन दिल्यानंतर नगराध्यक्षांनी संबंधित विभागांची संयुक्त बैठक बोलावली होती. बैठकीत रुग्णालय परिसरात वाढलेली झाडी, अस्वच्छता, तसेच मोडकळीस आलेल्या पोस्टमार्टेम इमारतीचा प्रश्न गांभीर्याने मांडण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले-देशाई यांनी चार दिवसांत परिसर स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले.पोस्टमार्टेम इमारतीलगत वाढलेल्या आंब्याच्या झाडाच्या फांद्या तात्काळ छाटण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी जागा नसल्याची बाब लक्षात घेऊन चार बाकडे बसविण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला.
शवागृहाकडे जाणारा रस्ता खराब अवस्थेत असून तो तातडीने दुरुस्त करण्यात येणार आहे. तसेच परिसरात प्रकाश व्यवस्था नसल्याने दोन ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी असलेली शासकीय निवासस्थाने अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. या इमारतींच्या दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी बांधकाम विभागाला दिल्या.
या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले-देशाई, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतिक बांदेकर, वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवळे, कृती समितीचे एन. बी. रेडकर, संजय लाड, क्रूज फर्नांडिस, आरोग्य निरीक्षक विनोद सावंत, उद्यान पर्यवेक्षक गजानन परब आदी उपस्थित होते.बैठकीतील सकारात्मक चर्चेमुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीने समाधान व्यक्त करत नगराध्यक्ष व संबंधित पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

