माजगावात महायुतीच्या सरपंच उमेदवार रंजना कंसे यांच्या प्रचाराचा शुभारंभ*
*माजगावात महायुतीच्या सरपंच उमेदवार रंजना कंसे यांच्या प्रचाराचा शुभारंभ*
माजगाव : महायुतीच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ. रंजना कंसे यांनी माजगाव येथील श्री महादेव व सातेरी मंदिरात नारळ ठेवून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
यावेळी श्री. संजू परब, सौ. रेश्मा ताई सावंत, मंडळ अध्यक्ष मधू देसाई, भाजपा सरचिटणीस महेश धुरी, सरपंच रिची डिमेलो, अशोक दळवी, माजी सरपंच श्री. हरमलकर, आर. के. सावंत सर, संजय कंसे, सुरेश सावंत, तातू सावंत, विष्णू वेजरे, रामदास भोगण, विशाल लाड, श्री. रेडकर, संजय माजगावकर आदी उपस्थित होते.
सौ. रंजना कंसे यांनी यावेळी ग्रामविकास, पायाभूत सुविधा व सर्वसमावेशक प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. गावातील नागरिकांच्या सहकार्याने विकासकामांना गती देण्याचा आपला प्रयत्न राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या शुभारंभानंतर माजगाव परिसरात महायुतीच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

