कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळगाव घाटीत भीषण अपघात.

*🛑मळगाव घाटीत भीषण अपघात.*

 

*🛑इको गाडी कोसळली खोल दरीत.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २१:-* शहरालगतच्या मळगाव घाटात आज सायंकाळी थरारक आणि धक्कादायक अपघात घडला. लग्न समारंभ आटोपून घरी परतत असताना इको कारचा चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट खोल दरीत कोसळली. सुमारे सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास डीके टुरिझम हॉल परिसरात ही दुर्घटना घडली.

या भीषण अपघातात गाडीचे अक्षरशः चक्काचूर झाले असून, त्यामधील चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी सर्वजण सावंतवाडीतील सालईवाडा येथील शिरसाट कुटुंबीय असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर काही क्षण परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरीत कोसळलेल्या वाहनातील जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, प्रवासी आणि काही सामाजिक कार्यकर्ते धावून आले. मात्र, मदतकार्य सुरू असतानाच त्या ठिकाणी गांधील माशांनी अचानक हल्ला चढवला, त्यामुळे बचावकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला. तरीही धैर्य न सोडता मदतकार्य सुरूच ठेवण्यात आले.

*सामाजिक बांधिलकीचा उत्तम नमुना*

या संकटसमयी अनेकांनी जीवाची पर्वा न करता मदतीचा हात पुढे केला. रवी जाधव, मायकल डिसोजा, विशाल बांदेकर, राजू, राहुल, मनोज नार्वेकर, नारायण चव्हाण, बाळा नार्वेकर, शुभम कळसुलकर, सुधीर जडिये, राकेश मसुरकर, अजित जाधव यांच्यासह इतर ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करत जखमींना दरीतून बाहेर काढले.

यानंतर जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घाटातील धोकादायक वळणे पुन्हा चर्चेत -या अपघातामुळे मळगाव घाटातील धोकादायक वळणे आणि सुरक्षा उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाने तातडीने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

एकूणच, लग्नाचा आनंद काही क्षणांतच दुःखद प्रसंगात बदलला असून, या अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!