🛑 सालईवाडा रस्त्यांची दुरवस्था ; काम पूर्ण होईपर्यंत गॅस पाईपलाईन रोखली
🛑 नगरसेवक देव्या सुर्याजी यांचा एमएनजीएलला इशारा ; नागरिकांच्या तक्रारीनंतर मोती तलाव परिसरातील काम बंद
🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL
✍ प्रतिनीधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-१७:– सालईवाडा परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून खणून ठेवलेल्या रस्त्यांची दुरवस्था कायम असल्याने, संबंधित काम पूर्ण केल्याशिवाय गॅस पाईपलाईनचे पुढील काम होऊ देणार नाही, असा इशारा नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला दिला. यानंतर मोती तलाव परिसरात सुरू असलेले काम तात्पुरते बंद पाडण्यात आले.
नगरसेवक सुर्याजी यांनी एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत निंबाळकर पीर, कामत नगर, कळसुलकर स्कूल, दैवज्ञ मंदिर ते युको बँक परिसराची पाहणी केली. या ठिकाणी रस्त्यांची झालेली दुरवस्था त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. चुकीच्या पद्धतीने रस्ते बुजविण्यात आल्याने नागरिकांना चालणे कठीण झाले असून, अरुंद रस्त्यांमुळे विशेषतः महिलांचे अपघात होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली.
यावेळी सुर्याजी यांनी अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. रस्त्यावर साचलेली माती समांतर करणे, मातीने बुजवलेली गटारे मोकळी करणे तसेच डांबरीकरण होईपर्यंत रस्त्यावर पाणी मारण्याचे निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, खडीकरण व डांबरीकरणासाठी आवश्यक निधी कंपनीकडून नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. संबंधित काम नगरपरिषदेकडून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गॅस पाईपलाईनचे कम्प्लिशन सर्टिफिकेट लवकरच देण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर नगरसेवक सुर्याजी यांनी मुख्याधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधत तीव्र नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत खणून ठेवलेले रस्ते सुस्थितीत आणले जात नाहीत, तोपर्यंत पुढील कामास परवानगी दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावर मुख्याधिकाऱ्यांनीही प्रथम प्रलंबित काम पूर्ण करण्याचे आदेश कंपनीला दिले.
या पाहणीवेळी मेहर पडते, ॲड. प्रथमेश प्रभू, श्री. सावंत यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

