कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑कोलगावमध्ये मृत्यूचा थरार! ओव्हरलोड ट्रकचा कहर — एसटी बसचा चक्काचूर,तिहेरी भीषण अपघात.

*🛑कोलगावमध्ये मृत्यूचा थरार! ओव्हरलोड ट्रकचा कहर — एसटी बसचा चक्काचूर,तिहेरी भीषण अपघात.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १५:-* सावंतवाडी-बेळगाव मार्गावरील कोलगाव येथे आज दुपारी एक भीषण तिहेरी अपघात घडून संपूर्ण परिसर हादरला. चिरा दगडांनी भरलेल्या ओव्हरलोड ट्रकने अनियंत्रित होऊन एसटी बस आणि डंपरला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की एसटी बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर डंपरचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

सुदैवाची बाब म्हणजे या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही क्षण उशीर झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,आंबेगाव-सावंतवाडी ही एसटी बस सावंतवाडी बसस्थानकाच्या दिशेने येत होती, तर डंपर माडखोलच्या दिशेने जात होता. त्याच वेळी बेळगावच्या दिशेने सुमारे ७०० चिरा दगड भरून येणारा ट्रक समोरून आला. ट्रक अत्यंत ओव्हरलोड असल्याने चालकाचा ताबा सुटला आणि त्याने प्रथम बसला, त्यानंतर डंपरला जोरदार धडक दिली.

अपघाताची माहिती मिळताच कोलगाव बीटचे हवालदार मनोज राऊत आणि सुरेश राऊळ यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. स्थानिक नागरिकांनीही तात्काळ मदतकार्य सुरू करत प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.

दरम्यान, या मार्गावर सुरू असलेली बेधडक ओव्हरलोड वाहतूक आता गंभीर चिंतेचा विषय बनली आहे. प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. “निष्पाप लोकांचे बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या प्रकारानंतर तरी प्रशासनाने ओव्हरलोड वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता स्थानिकांकडून केली जात आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!