गेळे ग्रामस्थांना त्यांच्या हक्काचे सातबारा मिळाले…* *🛑 तत्कालीन पालकमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार दीपक केसरकर, संदीप एकनाथ गावडे यांचे ग्रामस्थांनी मानले आभार…*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत.*
*🎴सावंतवाडी, दि१०- :-*
गेले अनेक वर्ष गेळे ग्रामस्थ हक्काच्या जमिनीसाठी शासन दरबारी आपल्या हक्काच्या जमिनीसाठी लढा देत होते. त्याला यश येत आज आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते गेले ग्रामस्थांना त्यांच्या हक्काच्या जमिनीचे सातबारा देण्यात आले. आंबोली चौकुळ व गेळे या गावातील जमिनी या कबुलायतदार गावकर जमिनी असल्याने त्या महाराष्ट्र शासनाने आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. यासाठी तीनही गावातील ग्रामस्थ जवळपास वीस पंचवीस वर्षे शासनाविरोधात दाद मागत होते. त्यापैकी गेळे गावातील कबुलायतदार गावकर जमीन आज गावकऱ्यांना त्या जमिनीचे सातबारा वाटप करण्यात आले. उर्वरित वन विभागाच्या ताब्यात असलेल्या जमिनीचे वाटप देखील लवकरच करण्यात येईल. अशी माहिती देखील दीपक केसरकर यांनी यावेळी दिली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. हे जमीन वाटप करण्यासाठी मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करून महाराष्ट्र शासनाचे १४ नियम शिथिल करण्यात आले ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जमीन मोजणी करण्यासाठी दीपेश माळकर व जमिनीचे नकाशे तयार करण्यासाठी गेळे येथील कु. आरती आनंद गावडे यांनी विशेष मेहनत घेतली. तत्कालीन पालकमंत्री माननीय रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे त्यांचे खंदे समर्थक संदीप एकनाथ गावडे यांनी शासकीय विभागातील अधिकाऱ्यांना एकत्रित करत हा ऐतिहासिक लढा जिंकला. प्रसंगी त्यांनी तत्कालीन प्रशासना विरोधात दोन दिवस उपोषण देखील केले. त्यामुळे गेळे ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या प्रक्रिये दरम्यान सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांचे फार मोठे मोलाचे सहकार्य लाभले तसेच एखाद्या शासकीय अधिकाऱ्याने मनावर घेतले तर कुठलेही अवघड काम सोपे होऊन जाते हे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या कार्य तत्परतेमुळे दिसून आले. त्यामुळे खेळे ग्रामस्थ त्यांचे कायमच ऋणी राहतील. या कार्यक्रमासाठी सावंतवाडी विधानसभेचे आमदार दिपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपविभागीय अधिकारी शारदा पवार, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, शोभा गावडे, पंचायत समिती सभापती सुश्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा, प्रशांत सुकी , गेळे सरपंच सागर ढोकरे, आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर, चौकोन सरपंच गुलाबराव गावडे उपसरपंच विजय गवस, ग्रामस्थ मनोहर बंड, तातोबा गवस ,मंडळ अधिकारी संजय यादव, ग्राम महसूल अधिकारी संतोष धोंड, संदिप मुळीक, सचिन चितारे, नंदकुमार ढेरे,आजगाव मंडळ अधिकारी कैलास गावडे, माडखोल मंडळ अधिकारी भारती गोरे अनुजा भास्कर यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी, आंबोली चौकुळ गेळे गावातील प्रमुख मानकरी, गेळे गावातील मुंबई पुणे गोवा स्थित असलेले सर्व नोकरदार वर्ग, गावातील आबाल वृद्ध उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_
*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*
*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*
*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*
*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*
*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*
*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*
*कसे वापरावे ?*
*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*
*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*
*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*
*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*
*संपर्कासाठी*
*9423254613*
*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*
*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

