कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कोकणचे भाग्यविधाते : झंझावाती नेतृत्वाचा धगधगता प्रवास – नारायणराव राणे

*🛑कोकणचे भाग्यविधाते : झंझावाती नेतृत्वाचा धगधगता प्रवास – नारायणराव राणे*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १०:-*

कोकणातील कणकवली तालुक्यातील फळसेवाडी सारख्या दुर्गम भागातून, डोळ्यांत स्वप्नांची ठिणगी आणि मनात जिद्दीची ज्वाला घेऊन मुंबईकडे निघालेला एक सामान्य तरुण… आणि पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ निर्माण करणारा, देशपातळीवर ठसा उमटवणारा नेता म्हणून उभा राहिलेले व्यक्तिमत्व म्हणजे नारायण राणे. हा प्रवास म्हणजे एखाद्या हॉलिवूड चित्रपटालाही लाजवेल असा थरार, संघर्ष आणि कर्तृत्वाची प्रेरणादायी कहाणीच!

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, घरची आर्थिक परिस्थिती बेताची, समाजात विशेष ओळख नाही… पण मनात एकच ध्यास – स्वतःला सिद्ध करायचे! या जिद्दीच्या बळावर राजकारणात पाऊल ठेवून प्रचंड आत्मविश्वास, धडाडी आणि कार्यक्षमतेच्या जोरावर देशातील मोजक्या प्रभावी नेत्यांमध्ये स्थान निर्माण करणारे राणे साहेब हे खऱ्या अर्थाने “स्वतः घडवलेले नेतृत्व” आहेत.

त्यांचा स्वभाव – बिनधास्त, रोखठोक आणि शब्दाला पक्का!

त्यांची शैली – स्पष्ट, आक्रमक आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट भाष्य करणारी!आणि त्यांची ओळख – सामान्य माणसासाठी लढणारा नेता!

“एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द आणि धमक माझ्यात आहे,” हा त्यांचा आत्मविश्वास केवळ शब्दात नाही, तर त्यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासात प्रत्ययास येतो. नगरसेवकापासून मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, केंद्रीय मंत्री आणि खासदार असा प्रवास म्हणजे एका झंझावाती लढवय्याचा इतिहास आहे.

*संघर्षातून घडलेले नेतृत्व*

राणे साहेबांच्या जीवनात संघर्ष हा अपवाद नाही, तर तोच नियम आहे. प्रत्येक टप्प्यावर अडथळे, विरोध, राजकीय चढ-उतार… पण त्यातून अधिक ताकदीने उभे राहण्याची जिद्द हेच त्यांचे वैशिष्ट्य!

त्यांच्या व्यक्तिमत्त्वात जिद्द आहे, त्याग आहे, समर्पण आहे, धडाडी आहे, कार्यक्षमता आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनतेप्रती निष्ठा आहे. “ओठात तेच पोटात” ही त्यांची भूमिका – राजकीय फायद्याची पर्वा न करता सत्य मांडण्याची हिंमत – हाच त्यांचा खरा अलंकार आहे.

कोकणचा कायापालट करणारा नेता

एकेकाळी मागासलेला म्हणून ओळखला जाणारा कोकण, आज विकासाच्या स्पर्धेत उभा आहे. या बदलामागे राणे साहेबांचे योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कोकणाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे काम झाले.

सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. रस्ते, शिक्षण, आरोग्य, रोजगार या सर्व क्षेत्रात त्यांनी केलेले काम आजही लोकांच्या स्मरणात आहे.

*सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवणारे कार्य*

राणे कुटुंबियांनी केवळ राजकारण केले नाही, तर हजारो कुटुंबांचे आयुष्य उभे केले.

बेरोजगार तरुणांना रोजगार

गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणअनाथांना आधार,वृद्धांसाठी निवारा,आधुनिक आरोग्य सुविधा,उच्च दर्जाचे हॉस्पिटल, इंजिनिअरिंग कॉलेज, डेअरी कॉलेज, महिला भवन, गोशाळा – या सर्व माध्यमातून त्यांनी कोकणातील जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळेच कोकणातील जनता त्यांना केवळ नेता मानत नाही, तर घरातील कर्ता पुरुष मानते. “दादा” ही हाक म्हणजे प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे प्रतीक आहे.

स्वप्न साकार करणारा ऐतिहासिक क्षणराणे साहेबांचे स्वप्न असलेल्या मेडिकल कॉलेजमधून नुकतीच MBBS ची पहिली १५० विद्यार्थ्यांची तुकडी डॉक्टर म्हणून बाहेर पडली – हा क्षण केवळ शैक्षणिक नाही, तर कोकणच्या भविष्याचा दीपस्तंभ आहे.

त्या पदवीदान सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील आनंद आणि पालकांच्या चेहऱ्यावरील समाधान हे राणे साहेबांच्या कार्याची खरी पावती होती. स्वतःच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान हे त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देणारे होते.

राजकीय वारसा आणि कुटुंबाचा ठसा आज राणे साहेब खासदार म्हणून कार्यरत आहेत.

त्यांचे सुपुत्र नितेश राणे मंत्री म्हणून, तर निलेश राणे आमदार म्हणून राज्याच्या राजकारणात प्रभाव टाकत आहेत.हे केवळ राजकीय यश नाही, तर एका कुटुंबाने समाजासाठी केलेल्या कार्याचा विस्तार आहे.

आक्रमकतेसोबत हळवे मन

राणे साहेबांचा स्वभाव जरी करारी आणि आक्रमक असला, तरी त्यामागे एक हळवे मन दडलेले आहे. फणसाच्या गोड गरासारखे – बाहेरून कठोर, पण आतून प्रेमळ!

ज्यांच्या संपर्कात आले, त्यांचे आयुष्य बदलले. त्यांच्या सहवासातून अनेकांना दिशा, प्रेरणा आणि आधार मिळाला.

*कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ*

रोज १८-१८ तास काम करूनही प्रत्येक कार्यकर्त्याची आणि सामान्य माणसाची काळजी घेणारा नेता आज दुर्मिळ आहे. राणे साहेब हे कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा, प्रेरणा आणि मार्गदर्शनाचे केंद्र आहेत.

त्यांच्या विश्वासामुळे अनेक सामान्य कार्यकर्त्यांना मोठी संधी मिळाली – हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद आहे.

*अंतिम शब्द*

“अथांग कार्याला तेजोमय ध्यासाला वय ही मर्यादा ठरू शकत नाही” – या वाक्याचा जिवंत उदाहरण म्हणजे नारायणराव राणे!

त्यांच्या कर्तृत्वाचे वर्णन करण्यासाठी शब्द कमी पडतील, कागद अपुरा पडेल आणि शाई संपेल… एवढे भव्य व्यक्तिमत्त्व!

आजच्या या शुभदिनी त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड कार्यशक्ती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

शुभेच्छुक:

संदिप कुडतरकर आणि कुटुंबीय

सावंतवाडी,सिंधुदुर्ग

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!