कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आरोंद्यात गॅस सिलेंडर साठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा.

*🛑आरोंद्यात गॅस सिलेंडर साठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा.*

 

*🛑गॅस पुरवठा करणारी गाडी ग्रामपंचायत मध्ये-याचा आर्थिक फटका वृद्धांना आणि ग्राहकांना सुद्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* सध्या आखाती देशातील युद्धाची झळ गावागावात पोहचली असून सध्या सगळीकडे गॅस सिलेंडर साठी ग्राहकांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.त्यामुळे ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळण्यासाठी बरीच कसरत करावी लागत असून त्यासाठी आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे.

आरोंदा ग्रामपंचायत कार्यालय येथे गॅस पुरवठा करणारी गाडी काल गुरुवार दिनांक २ एप्रिल रोजी गॅस सिलेंडर वितरण करण्यासाठी आली असता,गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. गॅस सिलेंडर साठी सकाळ पासूनच ग्राहक उभे होते.

मात्र दिवसेंदिवस वाढत असलेल्या गॅस तुटवड्यामुळे ग्राहकांची धावपळ होताना दिसत आहे.

काल आरोंदा येथील वृद्धांनासुद्धा याचा फटका बसल्याचे दिसले,गॅस पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे येथील गॅस लाभधारकांना त्रास सहन करावा लागल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते नरेश देऊलकर यांनी संबंधिताना याचा जाब विचारला.त्यावर त्यांनी इंटरनेट चालत नाही तसेच अन्य कारणे पुढे केली.

श्री देऊलकर यांनी, गॅस सिलेंडर पुरवठा करणारी गाडी ही ग्रामपंचायत कडे सर्व ग्राहकांना गॅस सिलेंडर वितरित करते,त्यामुळे तीन ते चार किलोमीटर वरील ग्राहकांना,वृद्धांना याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले.या समस्येबाबत आपण तहसीलदार यांना भेटून निवेदन देणार असल्याचे सांगताच,संबंधितांनी पुढील गॅस वितरण वेळी याबाबत नियोजन करून घरपोच सेवा देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी ग्रामपंचायत प्रशासक सायली साळगावकर,ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गॅस सिलेंडर मिळणार या आशेने येथील ग्राहक सकाळ पासूनच लांबच लांब रांगा लावताना दिसतात.मात्र यात वृद्ध व्यक्तींना,लाभधारकांना वेळ आणि आर्थिक नुकसान सोसून उन्हात रांगेत उभे राहून वाट पाहावी लागत आहे.तीन ते चार किलोमीटर वरून एखादे भाड्याने वाहन घेऊन सिलेंडर घेऊन गॅस पुरवठा वितरण ठिकाणीं घेऊन जाणे म्हणजे आर्थिक नुकसान होत आहे, गॅस पुरवठा करणारे मात्र वाहतुकीचा खर्च वसूल करून सुद्धा गॅस सिलेंडर गावात जावून देत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते नरेश देऊलकर यांनी नाराजी व्यक्त करून याबाबत आपण तहसीलदार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!