कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑१८५ कोटींचा शेअर मार्केट घोटाळा! राणे दांपत्यावर गंभीर आरोप – गुंतवणूकदारांना ‘महिन्याला ५% परतावा’चे आमिष.

*🛑१८५ कोटींचा शेअर मार्केट घोटाळा! राणे दांपत्यावर गंभीर आरोप – गुंतवणूकदारांना ‘महिन्याला ५% परतावा’चे आमिष*

 

*🛑अनपड सागर कारिवडेकर चा शेअर मार्केट मधील खरा गुरु कोण?*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- ०१:-* शेअर मार्केट प्रशिक्षणाच्या नावाखाली मराठी गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्या नंतर या प्रकरणात सचिन राणे आणि प्रीती राणे या दांपत्यासह सागर करिवडेकर यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. तब्बल १८५ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्याने ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०२१ पासून राणे दांपत्याने शेअर मार्केट प्रशिक्षण वर्गांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आकर्षित केले. महिन्याला ४ ते ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत त्यांनी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. हे पैसे सागर करिवडेकर यांच्या खात्यात जमा करण्यास सांगितले जात होते.व येथेच सागर कारिवडेकर भुलला व मालामाल झाला, कोट्यवधींच्या महागड्या गाड्या,२० कोटीचा ब़गला,सुरक्षा रक्षक,अंगरक्षक मौज मजा सगळेच मिळाले पण ते सर्व क्षणीक ठरले. *पैशांचा ‘रोटेशन गेम’ – नवीन गुंतवणूकदारांचे पैसे जुन्यांना!*

या योजनेत नव्या गुंतवणूकदारांकडून आलेले पैसे जुन्या गुंतवणूकदारांना परतावा म्हणून देण्यात येत असल्याचा आरोप आहे. म्हणजेच हा एक प्रकारचा पॉन्झी स्कीमचा प्रकार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

*गुंतवणूकदार असूनही ‘पीडित’ असल्याचा दावा!*

सचिन राणे यांनी स्वतः ऑक्टोबर २०२१ मध्ये १.२५ कोटींची गुंतवणूक केल्याचा दावा केला होता. मात्र, त्यांच्या स्वतःच्या कबुलीनुसार त्यांनी एप्रिल २०२५ पर्यंत दरमहा ५% परतावा घेत तब्बल ३ कोटी रुपये मिळवले. एवढा नफा कमावूनही त्यांनी स्वतःला पीडित दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

*पत्नीमार्फत गुंतवणुकीचा विस्तार**

सचिन राणे यांनी नियमित परतावा मिळाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रीती राणे यांनीही १.२५ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे.

*प्रशिक्षण वर्गातून ‘जाळं’ – प्रीती राणेंची भूमिका संशयात*

गुंतवणूकदारांच्या मते, प्रीती राणे या शेअर मार्केट प्रशिक्षण वर्गांच्या माध्यमातून लोकांना आकर्षित करत होत्या. विश्वास बसावा म्हणून करिवडेकर यांच्यासोबत MoU करण्यात आला होता, ज्यावर सचिन राणे यांनी ‘मेंटॉर’ म्हणून सही केली होती.

*फरार आरोपीचा व्हिडिओ – ‘माझ्यावर खोटा गुन्हा’*

या प्रकरणातील फरार आरोपी सागर करिवडेकर यांनी लपून बसलेल्या अवस्थेत एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यामध्ये त्यांनी राणे दांपत्य आपल्याला फसवत असल्याचा दावा करत, स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच, बँक खात्यांचे दस्तऐवज दाखवत सत्य बाहेर आणण्याचा दावा त्यांनी केला आहे.

*पोलीस तपास वेगात – ‘मनी ट्रेल’चा शोध सुरू*

ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) २५ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल केला असून, आरोपींच्या नातेवाईकांपर्यंत पैशांचा माग काढण्याचे काम सुरू आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र मांडलिक यांनी सर्व आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

*१,२४६ गुंतवणूकदारांची फसवणूक*

डिसेंबर २०२५ पर्यंत या योजनेत तब्बल १,२४६ गुंतवणूकदार सहभागी झाले होते. अनेकांनी आपली आयुष्यभराची बचत या योजनेत गुंतवली असून आता ते हवालदिल झाले आहेत.

*पध्दतशीर सापळा रचला*

“महिन्याला ४-५% हमखास परतावा” ही लालच देणारी योजना प्रत्यक्षात मोठा सापळा ठरल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणात कोण खरा मास्टरमाइंड आणि कोण ‘बळीचा बकरा’ हे तपासानंतरच स्पष्ट होणार असले, तरी सध्या मात्र गुंतवणूकदारांचा विश्वासघात झाल्याची भावना तीव्र आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!