🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात‘कागदी डॉक्टरांचा’खेळ?
*🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात‘कागदी डॉक्टरांचा’खेळ?*
*🛑न्यायालयालाही दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ३०:-* उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा भांडाफोड करणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने तब्बल २५ डॉक्टर कार्यरत असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र प्रत्यक्ष वास्तव पूर्णपणे वेगळे असल्याचा आरोप करत कृती समितीने प्रशासनाला थेट जाब विचारला आहे. “हे डॉक्टर नेमके कुठे आहेत?” असा थेट सवाल उपस्थित करत रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची तीव्र टीका करण्यात आली.
उपजिल्हा रुग्णालय कृती समितीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांची भेट घेत प्रशासनाच्या दाव्यांची उकल करण्याची मागणी केली. सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी आक्रमक भूमिका घेत “काही डॉक्टर फक्त कागदावरच हजर असतात, प्रत्यक्षात ते रुग्णालयात कधीच दिसत नाहीत. मग अशा ‘कागदी’ डॉक्टरांवर कारवाई का होत नाही?” असा रोखठोक सवाल केला.
दरम्यान, अभिनव फाऊंडेशनने दाखल केलेल्या जनहित याचिकेतही या प्रकाराचा उल्लेख असून जिल्हा शल्यचिकित्सकांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात डॉ. शंतनु तेंडुलकर, डॉ. धीरज सावंत, डॉ. भक्ती कुंभार हे पूर्णवेळ कार्यरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात ते किती वेळ रुग्णालयात सेवा देतात, ते खरोखरच पूर्णवेळ आहेत का, याबाबत गंभीर शंका उपस्थित करण्यात आली आहे.
*कृती समितीने प्रशासनाकडे ठोस मागण्या केल्या असून त्यात*—
मंजूर पदे, रिक्त पदे व प्रत्यक्ष कार्यरत डॉक्टरांची सविस्तर माहिती जाहीर करावीत,यायालयात दिलेल्या २५ डॉक्टरांच्या यादीचा खुलासा करावा.
प्रत्येक डॉक्टरची ड्युटी वेळ सार्वजनिक करावी,रुग्णालयात दर्शनी भागात माहितीफलक लावावा.
याशिवाय, २६ जानेवारी २०२६ रोजी उपोषण स्थगित करताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली का,याचाही लेखी हिशेब मागण्यात आला आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे — जर न्यायालयालाच चुकीची माहिती देण्यात आली असेल, तर हा केवळ प्रशासनाचा निष्काळजीपणा नसून हा थेट कायद्याचा अवमान ठरू शकतो. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, सावंतवाडीतील बहुचर्चित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रकल्पाची सद्यस्थिती काय आहे, याबाबतही प्रशासन मौन बाळगून असल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.
एकीकडे कागदावर डॉक्टरांची संख्या दाखवली जाते, तर दुसरीकडे रुग्णांना उपचारासाठी वणवण भटकावे लागते — ही परिस्थिती नेमकी कुणाच्या फायद्यासाठी? हा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
या प्रकरणामुळे सावंतवाडीच्या आरोग्य व्यवस्थेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून “कागदोपत्री व्यवस्था की प्रत्यक्ष सेवा?” हा संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

