कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये ‘पुस्तकं खरेदी आड भ्रष्टाचाराचे नवीन “कांड”?

*🛑सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये ‘पुस्तकं खरेदी आड भ्रष्टाचाराचे नवीन “कांड”?*

 

*🛑”*त्या” संशयास्पद पुस्तकं खरेदीचे कोट्याचे बिल पुरवठादारास अदा करण्यासाठी झाली नवीन “डील?”*

 

*🛑पुस्तक खरेदीमागे “भ्रष्टाचाराचा हैदोस!” सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडेंचा सणसणाटी आरोप.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- ३०:-* शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शासन निधीची लूटमार चालू असून भ्रष्टाचाराचे नवीन “कांड” समोर येत आहे. सन 2024-25 मध्ये सुमारे 2 कोटी किंमतीची पुस्तक खरेदीचा पुरवठा दाखवून देयक लाटण्याचा प्रकार उघडकीस आणत त्यावर आक्षेप देखील घेण्यात आला होता. प्रत्यक्षात मेडिकल कॉलेजमध्ये ग्रंथपाल कर्मचारी आस्थापनेवर नसताना कोट्यावधीची पुस्तक खरेदी कशाच्या आधारावर केली जात असल्याचा प्रश्न उपस्थित करत खरेदीत संशय उत्पन्न झाल्याने चौकशीची मागणी करण्यात आली होती. ह्यात प्रत्यक्षात 2 कोटीची पुस्तके फक्त कागदावरच दाखवून शासन निधी लाटण्याच्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात खरेदीच्या चौकशीसाठी व प्रत्यक्षात उपलब्ध पुस्तकांचे प्रमाणीकरण करण्यासाठी “खरेदी” प्रकरण आयुक्त कार्यालयाकडे प्रलंबित असताना देखील महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री. दवंगे यांच्याकडून पुरवठादारास कोट्यावधीचे देयक शासन मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली करून अदा करण्याचा घाट घातला जात आहे. यामध्ये पुरवठादाराशी लाखो रुपयांची “डील” झाल्याची चर्चा मेडिकल कॉलेजमध्ये रंगली असून पुस्तक खरेदी आड कोट्यावधींची देयके लाटत भ्रष्टाचाराचे नवीन कुरण मेडिकल कॉलेज कडे भ्रष्ट टोळीने शोधून काढले असल्याचा आरोप शिवसेना कामगार नेते तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी केला आहे. खरेदी प्रकरण आयुक्त स्तरावर चौकशी प्रविष्ट असताना देयक अदा करण्याचा घाट दिन कडून घालण्यामागे मोठे आर्थिक व्यवहार असून मेडिकल कॉलेज कडील भ्रष्ट टोळीने जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा हैदोस मांडला आहे. चालू वर्षी देखील पुस्तक खरेदी दाखवून त्याचेही देयक पुढील वर्षी गुपचूप पणे मंजूर करून घेतले की कोणाला त्याचा थांब पत्ता लागत नाही असा गोड गैरसमज भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कदाचित झाला आहे. मेडिकल कॉलेज कडील अधिकारी व कर्मचारी शासन निधीवर डल्ला मारत असल्याचे उघडपणे दिसत असून देखील नेमक्या कोणाच्या वरदहस्ताखाली लुटमारीचे प्रकार चालू आहेत याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. मेडिकल कॉलेज मध्ये भ्रष्टाचाराचा भस्मासुर मोठ्या प्रमाणावर हैदोस घालत असून जिल्हा आरोग्य यंत्रणा रसातळाला नेण्याचे काम डीन दवंगे व त्यांचे भ्रष्ट कर्मचारी करत आहेत असेच दिसून येत आहे. प्रत्येक प्रकरणात चौकशीचे फार्स उभे करायचे व नंतर 30 % व 40% वर डील करून देयके पारित करण्याचे धंदे राजरोसपणे चालू असल्याचे मेडिकल कॉलेज कडील कर्मचाऱ्यांकडून ऐकीवात आहे. या भ्रष्ट टोळीचा खरा “आका” कोण आहे हे लवकरच जिल्हा वासियांसमोर आणणार असून मेडिकल कॉलेज मध्ये प्रामाणिकपणाचे ढोंग करणाऱ्या अधिकाऱ्यांचा बुरखा लवकरच फाडणार असल्याचा इशारा प्रसाद गावडे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!