कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑बिल न भरल्याने पं. स. च्या तीन विभागांचा वीजपुरवठा खंडित.

*🛑बिल न भरल्याने पं. स. च्या तीन विभागांचा वीजपुरवठा खंडित.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २८:-* महावितरणचे थकीत वीजबिल भरणा करण्यासाठी नोटिसा पाठवूनही कार्यवाही न झाल्याने येथील पंचायत समितीच्या तीन विभागांचा वीजपुरवठा शुक्रवारी खंडित होण्याची वेळ आली. त्यामुळे पं. स. वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. तसेच कृषी विभागाच्या एका कार्यालयाचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आला. मात्र, त्यांनी लागलीच बिल भरणा केल्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यानंतर पं. स.च्या तीन पैकी एका विभागाने पैसे भरले असून दुसऱ्या विभागाने दोन दिवसांत भरण्याची ग्वाही दिली. तिसऱ्या विभागाचा मीटर दोन विभागांसाठी असल्याने तो वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

महावितरणकडून थकीत वीजबिल वसुलीबाबत अधिकाऱ्यांना टार्गेट देण्यात आलेली आहेत. तसेच थकीत बिले भरणा न करणाऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याच्या सूचना असून तसे न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट वरिष्ठ पातळीवरून कारवाईचे आदेशही देण्यात आलें आहेत. तसेच याबाबत प्रत्येक दिवसाचा आढावाही वरिष्ठ पातळीवरून घेण्यात येतो,असे समजते.

दरम्यान,पंचायत समितीमधील शिक्षण विभाग,जलसंधारण व एकात्मिक बालविकास या तीन विभागांची वीजबिले थकीत आहेत. याबाबत संबंधित विभागांना बिल भरणा करण्यासाठी नोटिसा डिसेंबर महिन्यात काढण्यात आल्या होत्या. शासनाकडून बिल भरण्यासाठीचे अनुदान उपलब्ध नसल्याने ही बिले भरण्यास विलंब होत असल्याचे संबंधित विभागांचे म्हणणे आहे.मात्र, महावितरण कंपनीकडून प्रत्येक दिवशीचा आढावा घेत,थकीत वीजबिलांबाबत कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच कारवाईच्या सूचना दिल्याने संबंधित तीन विभागांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!