🛑सावंतवाडीतील श्री एकमुखी दत्त मंदिरात २ एप्रिलला भव्य कलशारोहण सोहळा.
*🛑सावंतवाडीतील श्री एकमुखी दत्त मंदिरात २ एप्रिलला भव्य कलशारोहण सोहळा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*
*🎴सावंतवाडी, दि- २४:-* सावंतवाडी- सबनिसवाडा येथील ११० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिरात येत्या गुरुवार, दि. २ एप्रिल २०२६ रोजी चैत्र शुद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य ‘कलशारोहण सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीतर्फे ३० मार्च ते २ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपसमितीचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याने प.पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींच्या कृपेने हा सोहळा आयोजित करण्यात येत असल्याचे गवस यांनी सांगितले. मंदिर उभारणीसाठी योगदान देणाऱ्या सर्व दात्यांचे व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.
सोहळ्याची सुरुवात सोमवार, दि. ३० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता भव्य कलश दिंडीने होणार असून ही दिंडी मराठी शाळा क्र. ४ येथून निघून शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत मंदिरात आरतीने समारोप होईल. मंगळवार, दि. ३१ मार्च रोजी सकाळी शांतिपाठ, प्रायश्चित्त विधी, गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राध्द आदी विधी पार पडतील. त्यानंतर प्राकारशुद्धी, देवतांचे आवाहन व पूजन होऊन दुपारी महाप्रसाद होईल. सायंकाळी मंजिरी धोपेश्वरकर यांचा ‘भक्तीरंग’ तर रात्री निलेश मेस्त्री यांचा ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ हा कार्यक्रम सादर होणार आहे.
बुधवार, दि. १ एप्रिल रोजी पवमान अभिषेक, होमहवन, तुलसीपूजा होणार असून दुपारी महाप्रसादानंतर सायंकाळी योगेश सावंत भोसले यांचा ‘स्वरसाद’ आणि रात्री किरण सिद्धये संचलित ‘स्वरधारा’ हा संगीताचा कार्यक्रम होईल.
गुरुवार, दि. २ एप्रिल रोजी मुख्य ‘कलशारोहण सोहळा’ पार पडणार असून सकाळी विविध धार्मिक विधी, शतकलशार्चन व अभिषेक होणार आहेत. दुपारी १२.०१ वाजता शुभमुहूर्तावर कलशारोहण करण्यात येईल. यावेळी जगद्गुरु शंकराचार्य श्री सच्चिदानंद (संकेश्वर करवीर पीठ), प.पू. दत्तानंद भारती स्वामी महाराज (नृसिंहवाडी), प.पू. शरद जोशी महाराज (पुणे) तसेच माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते कलशपूजन व कलशारोहण होणार आहे.
यानंतर आरती व महाप्रसाद, ह.भ.प. स्नेहलदिप प्रभाकर सामंत यांचे कीर्तन, श्रींची पालखी व रात्री ‘नादब्रह्म’ हा संगीत कार्यक्रम होणार आहे.
या भव्य सोहळ्याचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन उपसमितीचे अध्यक्ष दयानंद गवस, सचिव खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, खजिनदार सुधीर धुमे व सदस्यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

