कोकणमहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

🛑व्यवहार करताना सावधानता बाळगा; सजग ग्राहक बना!

*🛑व्यवहार करताना सावधानता बाळगा; सजग ग्राहक बना!*

 

*🛑वैभववाडी तहसील कार्यालयात ४४ वा जागतिक ग्राहक हक्क दिन प्रबोधनात्मक वातावरणात साजरा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वैभववाडी, दि- २४:-* आजच्या डिजिटल आणि वेगवान व्यवहारांच्या युगात ग्राहकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. वस्तू-सेवा खरेदी करताना किंवा कोणताही आर्थिक व्यवहार करताना फसवणूक टाळण्यासाठी काळजी घेणे अत्यावश्यक असून, जर कुठे फसवणूक झालीच तर संबंधित शासकीय यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधावा, असे स्पष्ट आवाहन वैभववाडीचे तहसीलदार सुर्यकांत पाटील यांनी केले.

वैभववाडी तहसील कार्यालय आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र, वैभववाडी तालुका शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने २३ मार्च रोजी आयोजित ४४ व्या जागतिक ग्राहक हक्क दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी ग्राहक जागृती आणि हक्क संरक्षण या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यंदाचा ग्राहक दिन “सुरक्षित उत्पादने, आत्मविश्वासपूर्ण ग्राहक” या संकल्पनेवर साजरा करण्यात आला.

तहसीलदार पाटील यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या कार्याचे कौतुक करत प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली.

ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील यांनी “फसू नका, कुणाला फसवू नका; स्वतः सजग व्हा आणि इतरांनाही सजग करा” असा प्रभावी संदेश दिला.

तालुका अध्यक्ष कुमार स्वामी यांनी ग्राहक हक्कांसोबतच वीजपुरवठा, स्वच्छता, तसेच आपत्कालीन किंवा युद्धजन्य परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याकडे प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली.

यावेळी अॅड. प्रताप सुतार यांनी नवीन ग्राहक संरक्षण कायदा २०१९, तसेच माहितीचा अधिकार याविषयी मार्गदर्शन केले. तर तालुका सचिव तेजस साळुंखे यांनी ग्राहक पंचायत संस्थेची रचना, कार्यपद्धती आणि तक्रार निवारण प्रणाली यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमास तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, रेशनिंग दुकानदार, तसेच महिला ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी पाटील यांनी केले, तर आभार रामेश्वर दांडगे यांनी मानले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!