कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑आपलो सिंधुदुर्ग उपक्रमाची कार्यशाळा संपन्न.

*🛑आपलो सिंधुदुर्ग उपक्रमाची कार्यशाळा संपन्न.*

 

*🛑जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे मार्गदर्शन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- १६:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांची समृद्ध माहिती जागतिक पातळीवर पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या “आपलो सिंधुदुर्ग” या नावीन्यपूर्ण उपक्रमाची दुसरी कार्यशाळा जिल्हा परिषद ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उत्साहात पार पडली. या कार्यशाळेला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर आणि शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली आपलो सिंधुदुर्ग हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावाची सविस्तर माहिती विकिपीडिया या जागतिक डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून सुमारे ८० तज्ञ शिक्षकांची निवड करण्यात आली असून त्यांनी आतापर्यंत सुमारे ६० गावांची माहिती विकिपीडियावर प्रसिद्ध केली आहे. या माहितीमध्ये त्या गावाचा इतिहास, वैशिष्ट्ये, शैक्षणिक सुविधा, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे तसेच गावाशी संबंधित आकर्षक छायाचित्रे अशा विविध अंगांनी माहिती संकलित करून ती व्यवस्थित पद्धतीने सादर केली जात आहे.

या कार्यशाळेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेत शिक्षकांचे कौतुक केले. तसेच माहिती संकलन करताना अचूकता, विश्वसनीयता आणि सुस्पष्टता यांना विशेष महत्त्व देण्याचे आवाहन त्यांनी केले. गावांची खरी ओळख जगासमोर आणण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असून शिक्षकांनी यामध्ये अधिक उत्साहाने सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

कार्यशाळेदरम्यान काही शिक्षकांनी गावांची माहिती संकलित करताना आलेले अनुभव आणि आव्हाने सांगितली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन करत पुढील कामासाठी आवश्यक सूचना दिल्या.

दरम्यान, पुढील आठवड्यात तालुकानिहाय तज्ञ शिक्षकांची निवड करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ७५६ गावांची माहिती महिनाभरात विकिपीडियावर उपलब्ध करून देण्याचा संकल्प या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

या कार्यशाळेला उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) फारुकी अहमदि अफसोरोद्दीन, उपशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात, उपशिक्षणाधिकारी भोजराज शेर्लेकर, तसेच या उपक्रमाचे जिल्हा समन्वयक जावेद तांबोळी यांच्यासह जिल्ह्यातील तज्ञ शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!