महाराष्ट्रमुंबईसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सालईवाडा परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; महिलेसह अनेकांना चावा — आरोग्य यंत्रणेवर हलगर्जीपणाचा आरोप

सालईवाडा परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; महिलेसह अनेकांना चावा — आरोग्य यंत्रणेवर हलगर्जीपणाचा आरोप
सिंधुदुर्ग :
सालईवाडा परिसरात काळ्या रंगाच्या पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः दहशत निर्माण केली असून अनेक नागरिकांना चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी या कुत्र्याने दिव्या दत्तगुरु मोरजकर (वय ४५) या महिलेला चावा घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चावा घेतल्यानंतर जखमी झालेल्या दिव्या मोरजकर यांना तातडीने उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. परिसरातील इतर काही नागरिकांनाही या कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकाराबाबत त्वरित कारवाई व्हावी यासाठी माजी नगरसेवक विलास जाधव यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, वारंवार फोन करूनही अधिकाऱ्यांनी फोन न उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासनाची ठिसूळता पुन्हा एकदा समोर आल्याची टीका होत आहे.
स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत संबंधित पिसाळलेल्या कुत्र्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, कुत्र्याचा बंदोबस्त करण्यात विलंब झाल्यास परिसरात मोठा अनर्थ घडण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!