प्रसिद्ध व्यापारी साईनाथ राजाराम मुंज यांचे दुःखद निधन
सावंतवाडी, ता. ०७: येथील प्रसिद्ध व्यापारी साईनाथ राजाराम मुंज (६७) यांचे आज शनिवारी गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सूना, नातवंडे असा परिवार आहे. सावंतवाडीतील चेतन कम्युनिकेशनचे संचालक श्रेयस मुंज यांचे ते वडील होत.

