कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘टेक्सलन्स २०२६’ उत्साहात संपन्न….

*🛑भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘टेक्सलन्स २०२६’ उत्साहात संपन्न….*

 

*🛑भावी अभियंत्यांच्या कल्पकतेचा अविष्कार : विविध स्मार्ट प्रोजेक्ट्सना विजेतेपद….*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातर्फे आणि आयएसटीई पुरस्कृत ‘टेक्सलन्स २०२६’ ही राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धा भोसले नॉलेज सिटी येथे उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. रमण बाणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी उपप्राचार्य गजानन भोसले तसेच परीक्षक म्हणून शासकीय तंत्रनिकेतन कराडचे योगेश महाडिक, एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजचे डॉ. एस. के. कुलकर्णी, एमआयटीएम कॉलेजच्या उपप्राचार्या पूनम कदम आणि शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे सचिन जोशी उपस्थित होते. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर या विभागांतील विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना समारोपप्रसंगी रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

मेकॅनिकल विभागाच्या पेपर प्रेझेंटेशनमध्ये रमेश लठ्ठे व संस्कार अणावकर प्रथम, तर साहिल जाधव व सोनू हरमलकर द्वितीय आले. फोटोग्राफी स्पर्धेत संस्कार अणावकर प्रथम तर लोकेश भोगण द्वितीय ठरला. कॉम्प्युटर विभागाच्या प्रोजेक्ट स्पर्धेत पारस गावडे, करण गवस, सुजल घागरे, निशांत जाधव व मंथन कर्पे यांच्या ‘अनमॅन्ड डिफेन्स व्हेईकल’ प्रोजेक्टला प्रथम तर मिताली चव्हाण, तन्वी मेस्त्री, भूमिका सातार्डेकर, मालिनी वारंग व गौरी राऊळ यांच्या ‘स्मार्ट ग्रास कटिंग रोबोट’ प्रोजेक्टला द्वितीय क्रमांक मिळाला. ‘माईंड मॅट्रिक्स – द पझल अरेना’ या स्पर्धेत लक्ष्मीप्रसाद कानडे व ‘बग बस्टर्स’ ग्रुप प्रथम, तर दीक्षा गवस व ‘लॉजिक लिजंड्स’ ग्रुप द्वितीय आले.

इलेक्ट्रिकल विभागाच्या प्रोजेक्ट स्पर्धेत रितेश गवस व ग्रुपच्या ‘ॲडव्हान्स सोलर पॉवर स्प्रेयर’ प्रोजेक्टला प्रथम, तर तेजस गावडे व ग्रुपच्या ‘आयओटी बेस्ड सोलर ग्रास कटर’ प्रोजेक्टला द्वितीय क्रमांक मिळाला. पोस्टर स्पर्धेत ‘सेव्ह एन्व्हायरर्मेंट – सेव्ह फ्युचर’ या विषयासाठी चैतन्य भगत व समरेश नाईक प्रथम, तर ‘इंडस्ट्री फाईव्ह’ या विषयासाठी कुणाल धुरी व ऋषिकेश राऊळ द्वितीय ठरले. सिव्हिल विभागाच्या प्रोजेक्ट स्पर्धेत दत्तराज कोदे, हरिश्चंद्र धुरी, मानसी खवणेकर, अथर्व धुरी व रविराज सावंत यांच्या ‘पिझो-इलेक्ट्रिक फूट स्टेप पॉवर जनरेशन’ प्रोजेक्टला प्रथम तर रुद्रेश पडते, तनिषा गवस, आर्यन आसोलकर, गुंजन धुरी व तनिषा बंगे यांच्या ‘फिलर स्लॅब’ प्रोजेक्टला द्वितीय क्रमांक मिळाला. रील मेकिंग स्पर्धेत एँजेलिना डिसोझा व टीम प्रथम तर आर्यन पास्ते व टीम द्वितीय ठरली.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मान्यवरांनी कौतुक केले. उद्घाटन कार्यक्रमाचे निवेदन हवाबी शेख तर समारोपाचे सूत्रसंचालन संचिता कोलापते यांनी केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!