पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा फायदा घेऊन महिलांनी आत्मनिर्भर बनावे .*:— *सौ.स्मिता दामले , भाजपा – वेंगुर्ले महिला मोर्चा अध्यक्षा
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴ठिकाण :वेंगुर्ले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा फायदा घेऊन महिलांनी आत्मनिर्भर बनावे .:
सौ.स्मिता दामले , भाजपा – वेंगुर्ले महिला मोर्चा अध्यक्षा
—————————————-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटीचे आत्मनिर्भर पॅकेज विविध प्रकारच्या उद्योगासाठी जाहीर केले . याच पॅकेजच्या माध्यमातून बचत गटात काम करणारयांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना ( PMFME ) सन २०२० ते २०२५ या पाच वर्षे कालावधीसाठी सुरु केली आहे . सदर योजने अंतर्गत DAY – NRLM मधील स्थापित समुह जे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग व्यवसायामध्ये समाविष्ट आहेत , त्यांच्या व्यवसाय व्रुद्धी करीता *बीज भांडवल* देण्याची तरतूद करण्यात आली आहे .सदर योजनेसाठी कृषी विभाग – महाराष्ट्र शासन हा नोडल विभाग कृषी आयुक्तालय , पुणे हे नोडल एजन्सी म्हणून काम पहाणार आहोत
PMFME योजनेमार्फत अन्नपदार्थ प्रक्रिया उद्योगामधील स्वयं साहयता समुहांसाठी विशेषतः प्राधान्य देण्यात आलेले आहे .या अंतर्गत *शेतकरी उत्पादक कंपनी , स्वयं साहयता समुह , ग्रामसंघ , प्रभाग संघ* यांना भांडवल गुंतवणूकीसह संपुर्ण मुल्यवर्धक साखळीमधील गुंतवणूकीवर ३५ % पर्यंत Credit link Grant उपलब्ध होणार आहे . तसेच *४०,००० रुपये* *प्रती स्वयं साहयता समुह सदस्य* अशा पध्दतीने बीज भांडवल ( Seed Capital ) देण्याची तरतूद आहे . या व्यतिरिक्त अन्नपदार्थ प्रक्रिया मधील उद्योगांसाठी आवश्यक एकत्रित पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी , स्वयं साहयता समुह , ग्रामसंघ , प्रभाग संघ यांना ३५ % पर्यंत Credit link Grant उपलब्ध करुन देण्याची तरतूद करण्यात आली आहे .
समुदाय संस्थेसाठी बीज भांडवल ( Seed Capital ) संपूर्णतः अनुदान स्वरुपात असुन लाभ घेणारया समुह सदस्यांसाठी हे बिज भांडवल ( Seed Capital ) वार्षिक ३%च्या व्याज दराने कर्ज स्वरुपात असणार आहे . सदर कर्जाचा परतावा करताना व्याजाची विभागणी – १% स्वयं साहयता समुह , १% ग्रामसंघ व १% प्रभागसंघ या स्वरूपात असणार आहे .
तरी या योजनेचा जास्तीत जास्त बचतगटांच्या महीलांनी फायदा घेऊन आत्मनिर्भर बनावे असे आवाहन वेंगुर्ले महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता दामले यांनी केले आहे .
💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥
🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥
_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._
🤷🏻♂️आमचा पत्ता ⬇️
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_