कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑टेनिस कोर्ट रुंदीकरणाच्या नावाखाली सावंतवाडी जिमखान्यातील जुन्या झाडांची कत्तल; क्रीडाप्रेमी संतप्त

*🛑टेनिस कोर्ट रुंदीकरणाच्या नावाखाली सावंतवाडी जिमखान्यातील जुन्या झाडांची कत्तल; क्रीडाप्रेमी संतप्त*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* सावंतवाडी जिमखाना मैदान येथे लाँग टेनिस कोर्ट रुंदीकरणाचे काम सावंतवाडी नगरपालिका यांच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. मात्र या कामादरम्यान टेनिस कोर्टला लागून असलेली वर्षानुवर्षे सावली देणारी जुनी झाडे प्रशासनाने तोडल्याने क्रीडाप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मैदान परिसरात खेळाडू, प्रेक्षक आणि सकाळ-संध्याकाळ व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना ही झाडे मोठा आधार होती. उन्हाळ्यात याच झाडांच्या सावलीत खेळाडूंना विश्रांती मिळत होती. मात्र कोणतेही ठोस कारण किंवा पर्यायी नियोजन न मांडता झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

“विकास हवा, पण तो पर्यावरणाच्या बळीवर नको,” अशी ठाम भूमिका स्थानिक क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे. एक झाड मोठे होण्यासाठी अनेक वर्षे लागतात; मात्र ते तोडण्यासाठी काही क्षण पुरेसे ठरतात. त्यामुळे हा विकास नसून परिसर भकास करण्याचा प्रकार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला आहे. त्यांनी सांगितले की, “लाँग टेनिस खेळणाऱ्या काही मोजक्या व्यक्तींसाठी वर्षानुवर्षे उभी असलेली झाडे तोडण्याची गरज नव्हती. टेनिस कोर्ट अद्ययावत करताना झाडे वाचविण्याचा पर्याय उपलब्ध होता. मात्र तो विचार न करता प्रशासनाने पर्यावरणाची हानी केली.”

विशेष म्हणजे, शहरात नगरपालिका ‘माझी वसुंधरा’ अभियान राबवत असताना प्रत्यक्षात जुनी झाडे तोडली जात असतील, तर हा दुटप्पीपणा असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. “वसुंधरा वाचवण्याच्या घोषणा आणि प्रत्यक्ष कृती यामध्ये तफावत का?” असा सवालही उपस्थित करण्यात आला.

या वेळी अमेय तेंडोलकर, राजू भालेकर, महेश डोंगरे, पिंट्या गावडे, सतीश आकेरकर, गौरव केसरकर, नितीन सावंत, अमित सावंत, अतुल केसरकर, दिपक केसरकर, अमरेश आसोलकर, रोहन लाखे, विजय लाखे, रोहन पाटील, अमित लाखे आदी क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.

जिमखाना मैदान परिसरातील झाडांची तोड थांबवून पर्यावरणपूरक पर्याय अवलंबावा,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!