आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 शैक्षणिक क्षेत्रातील कार्य सुरूच ठेवणार ; शिरीष नाईक* 

🛑 आरोस विद्या विकास हायस्कूल चे मुख्याध्यापक शिरीष नाईक यांचा सेवानिवृत्तीपर प्रशालेत सत्कार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍ प्रतिनिधी : मदन मुरकर

*🎴सावंतवाडी, दि-२८:-* आरोस विद्या विकास हायस्कूल मुख्याध्यापक शिरीष नाईक सेवानिवृत्तपर निरोप समारंभात विविध स्तरातील मान्यवरांनी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याबद्दल प्रशंसा करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल चे मुख्याध्यापक शिरीष नाईक हे दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त प्रशालेच्या वतीने आरोस विद्या विकास हायस्कूल मध्ये निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विविध स्तरातील मान्यवरांनी त्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

 

कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन,स्वागत गीताने करण्यात आली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री शारदादेवी प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलनाने करून मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष निलेश परब ,सेक्रेटरी राजन नाईक,आजगाव प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत, आरोस विद्या विहार चे सदाशिव धुपकर, सातार्डा हायस्कूल चे मुख्याध्यापक प्रशांत सावंत, आरोंदा हायस्कूल चे मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे, गोविंद मौर्ये ,एल.के सावंत, साटेली उपसरपंच बाबा कोरगावकर, साक्षी नाईक,अर्जुन मुळीक,सुरेश गावडे ,माजी मुख्याध्यापक शांताराम आसोलकर,सरोज नाईक,संचालक मिलिंद जोग,बाळा नाबर,विलास साटेलकर,सुनील नाईक, शैलेश नाईक,दशावतार कलाकार संतोष रेडकर,संदीप नेमळेकर आदी विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.

 

 

श्री .नाईक यांनी आपला सेवाकाल ची सुरुवात १७ जुलै १९९३ रोजी केली होती.३३ वर्षे सेवाकाल मध्ये त्यांनी उत्कृष्ठ असे अध्यापनाचे कार्य करून बरेच विद्यार्थी घडविले.

अध्यापन करत असताना त्यांना बरेच पुरस्कार प्राप्त झाले. यात २०१४ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळाचा स्वर्गीय बाळकृष्ण बागवे स्मृती आदर्श हिंदी प्रचारक पुरस्कार , सन २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडी कडून शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कोकण रत्न पुरस्कार , सन २०२१/ २२ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघ यांच्याकडून शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव पत्र देऊन सन्मान, तसेच २१ /४/ २०२४ ते ३० /१२/ २००७ या कालावधीत साटेली तर्फ सातार्डा (ता.सावंतवाडी) गावाचे सरपंच पद भूषविताना “निर्मळ ग्राम पुरस्कार” तत्कालीन राष्ट्रपती सन्माननीय ए.पी. जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला.

 

श्री.नाईक यांच्या सेवानिवृत्ती समारंभ कार्यक्रमात उपस्थित मान्यवर,ग्रामस्थ,मित्रपरिवार व विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

कार्यक्रमात श्री.नाईक यांनी बोलताना आपल्या कारकीर्दीतील आठवणी सांगत ,आपला जो प्रशालेने , मित्रपरिवाराने सन्मान केला तो कधीही विसरणार नसून, आपण सेवानिवृत्त झालो तरी आपले शैक्षणिक ,सामाजिक कार्य सुरूच राहणार असल्याचे सांगितले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी वरक, प्रस्तावना अनिल नाईक तर आभार अर्जुन मुळीक यांनी मानले.

यावेळी प्रशालेचे शिक्षक देवयानी चव्हाण,श्रद्धा मुळीक, मिताली नाईक,कृपा नेमळेकर, शिक्षकेतर कर्मचारी तानाजी खोत,पालक,ग्रामस्थ ,विविध स्तरातील मान्यवर ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

*………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_

 

*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*

 

*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*

 

*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*

 

*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*

 

*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*

 

*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*

 

*कसे वापरावे ?*

 

*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*

 

*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*

*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*

 

*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*

 

*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*

 

*संपर्कासाठी*

*9423254613*

 

*⭕इतर सुविधा ⭕*

*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*

*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*

 

 

*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*

*व्हाट्सअप करा-9423878887*

*9423254613*

 

 

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!