कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑तिलारी – पारगड रस्त्यासाठी १५ कोटी मिळावेत !

*🛑तिलारी – पारगड रस्त्यासाठी १५ कोटी मिळावेत !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- २६:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ल्यास जोडणाऱ्या तिलारी-घोडगेवाडी-मार्ले-पारग ड या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामांसाठी २०२६ च्या अर्थसंकल्पात १५ कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी आमदार दीपक केसरकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली आहे.

आमदार केसरकर यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी – घोडगेवाडी – मार्ले – पारगड हा रस्ता पूर्वी जुना राष्ट्रीय महामार्ग १३१ म्हणून ओळखला जात होता. नंतरच्या पुनः वर्गीकरणात या मार्गाला नवीन राष्ट्रीय महामार्ग १८७ चा दर्जा देण्यात आला आहे. या रस्त्याची एकूण लांबी सुमारे ०/०० ते १७.२०० किमी असून त्यातील काही भाग सिंधुदुर्ग तर उर्वरित भाग कोल्हापूर जिल्ह्यात येतो.

हामार्ग दोडामार्ग भागातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पारगड येथे जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सिंधुदुर्ग व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना सर्वात जवळचा जोडणारा हा मार्ग असल्याने स्थानिक वाहतूक, व्यापार आणि पर्यटन विकासासाठी तो अत्यावश्यक ठरतो.

दोडामार्ग तालुक्यातील रहिवाशांची या मार्गाच्या उन्नतीकरणाची अनेक वर्षांची मागणी असल्याचे केसरकर यांनी नमूद केले आहे. रस्त्याची दुरवस्था आणि वारंवार होणारे अपघात लक्षात घेता तातडीने काम हाती घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्याच्या बांधकामासाठी अंदाजे १० कोटी आणि सुरुवातीच्या ८०० मीटर खासगी जमिनीच्या संपादनासाठी सुमारे ५ कोटी असा एकूण १५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पीय निधीतून तरतूद करावी, अशी विनंती आमदार केसरकर यांनी पत्रातून केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!