कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑उपरल स्मशानभूमीतील दफनविधीची जागा मोकळी करावी,नागरिकांचे निवेदन.

*🛑उपरल स्मशानभूमीतील दफनविधीची जागा मोकळी करावी,नागरिकांचे निवेदन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २५:-* सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपरल स्मशानभूमीमध्ये ओहोळाच्या बाजूने दफनविधी करणाऱ्या जागेमध्ये वाळलेली जीर्ण झाडे तुटून पडलेली आहेत. त्याशिवाय अन्य झाडे व पालापाचोळा पडलेला असल्याने दफनविधी करताना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे दफनविधी स्मशानभूमी शेडच्या मोकळ्या जागेत होत आहेत. याकडे प्रशासन व नगराध्यक्षांनी लक्ष देऊन हा प्रश्न सोडवावा, अशा मागणीचे निवेदन शहरातील जागृत नागरिकांनी दिले आहे.

निवेदनात असे नमूद केले की. नगरपरिषदेच्या उपरल स्मशानभूमीमध्ये हिंदूंच्या अंत्यसंस्कार शेडच्या बाजूला ओहोळालगत हिंदू समाजाच्या कोलाटी, बौद्ध, लिंगायत व बेवारस मृतदेहांच्या दफनविधीसाठी पूर्वीपासून नगरपरिषदेने जागा उपलब्ध करून दिलेली आहे. मात्र, या जागेत फार जुनी झाडे कोसळलेली आहेत. काही झाडे कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच, पालापाचोळा, काटेरी झाडे असून या जागेची स्वच्छता केली जात नसल्याने तेथे दफनविधी करताना उपस्थितांना व त्यांच्या नातेवाईकांना अडचणीचे ठरत आहे. अडचणीच्या जागेत दफनविधी सोयीस्कर नसल्याने स्मशानभूमीतील शेडच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत दफनविधी केले जात आहेत. याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे होते.

सदरच्या दफनभूमीची जागा तात्काळ स्वच्छ करावी. मोडलेली झाडे तात्काळ बाजूला करुन न हटविल्यास, शेडच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत. दफनविधी होऊन या जागेत कायमस्वरूपी अतिक्रमण होणार आहे. प्रशासनाने प्रत्यक्ष येऊन पाहणी करावी. दफनविधीची जागा स्वच्छ करून त्याठिकाणी संरक्षण भिंत बांधावी.

या निवेदनात शहरातील जागृत नागरिक सुधीर पराडकर, शांताराम कावले, बंड्या पोकळे, कुलदीप बिरोडकर, प्रसाद पोकळे, चेतन गावकर, कुंदन टोपले, गजानन राऊळ, संतोष केळकर, संतोष गवस, अॅड. रामनाथ बावकर, यशवंत देसाई, सुभाष तावडे, उमेश परब वगैरे ३२ जागृत नागरिकांनी सह्यांचे निवेदन दिले आहे. हे निवेदन नगरपालिका मुख्याधिकारी,नगराध्यक्ष यांना दिले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!