कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑दोन-दोन नगराध्यक्षांचा गोंधळ!

*🛑दोन-दोन नगराध्यक्षांचा गोंधळ!*

 

*🛑नगराध्यक्ष ऑनलाईन हजेरीवरून सावंतवाडी पालिकेत खडाजंगी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २४:-* सावंतवाडी नगरपालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा प्रचंड गदारोळात पार पडली. सत्ताधारी भाजपच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले या ऑनलाईन पद्धतीने बैठकीला उपस्थित राहिल्याने विरोधी पक्षाचे नगरसेवक संजू परब यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि सभागृहात वातावरण तापले.

शिंदे गटाच्या शिवसेनेचे नगरसेवक संजू परब यांनी नगराध्यक्षांच्या ऑनलाईन उपस्थितीला थेट विरोध करत “तात्काळ ऑनलाईन सिस्टीम बंद करा” अशी मागणी केली. नगराध्यक्षा रजेवर असताना त्यांनी बैठकीत सहभागी होणे नियमबाह्य असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. “दोन-दोन नगराध्यक्ष कशासाठी?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

वाढत्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी विरोधकांची सूचना मान्य करत ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सभागृहातील तणाव काहीसा निवळला.

दरम्यान, शहरातील ५७ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही संजू परब यांनी केला. संबंधित कामासाठी अभियंता नसल्याचा मुद्दा उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

सभेत विरोधी पक्षनेते बाबू कुडतरकर, काँग्रेसचे नगरसेवक तौकीर शेख, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक देवेंद्र टेमकर यांनी प्रश्नोत्तरांमध्ये सहभाग घेत विविध मुद्द्यांवर प्रशासनाला जाब विचारला.आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर मडगावकर, अॅड. सायली दुभाषी, अॅड. नीता सावंत करकर, आनंद नेवगी यांनीही विविध विषयांवर भूमिका मांडली. शहरातील रस्ते खोदाईच्या वाढत्या समस्येकडे स्वीकृत नगरसेविका अॅड. नीता सावंत कविटकर यांनी विशेष लक्ष वेधले.

पहिल्याच सभेत ऑनलाईन उपस्थितीचा वाद, भ्रष्टाचाराचे आरोप आणि प्रशासनावर सवालांची सरबत्ती यामुळे सावंतवाडी नगरपालिकेची सभा चांगलीच वादळी ठरली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!