सावंतवाडीत ‘मन की बात’चा जल्लोष! युवा नेते विशाल परब कार्यकर्त्यांसह थेट सहभागी
सावंतवाडीत ‘मन की बात’चा जल्लोष! युवा नेते विशाल परब कार्यकर्त्यांसह थेट सहभागी
सावंतवाडी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाचे प्रक्षेपण सावंतवाडीतील भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयात उत्साहात पार पडले. यावेळी भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशालजी परब यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांसमवेत कार्यक्रमाचा लाभ घेत थेट सहभाग नोंदवला.
संपर्क कार्यालयात विशेष एलईडी स्क्रीन, ध्वनी व्यवस्था आणि आसन व्यवस्थेचे भव्य नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रम सुरू होताच कार्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहून पंतप्रधानांचे विचार मनोभावे ऐकत होते.यावेळी विशालजी परब म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम देशातील सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधणारा एक प्रभावी मंच ठरला आहे. समाजातील प्रेरणादायी कथा, नवकल्पना आणि राष्ट्रहिताचे विचार यामुळे हा कार्यक्रम दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पंतप्रधानांचे विचार पोहोचावेत, यासाठीच संपर्क कार्यालयात प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.”
कार्यक्रमानंतर उपस्थितांमध्ये विविध विषयांवर चर्चा रंगली. ‘मन की बात’मधील संदेश समाजकार्यात कसे उतरवायचे, यावरही कार्यकर्त्यांनी संवाद साधला. सावंतवाडीतील भाजपा कार्यालयात झालेल्या या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर पक्षकार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचे चित्र पाहायला मिळाले.

