🛑बाह्य मूल्यमापनात आंबडपाल शाळेची उत्कृष्ट कामगिरी.
*🛑बाह्य मूल्यमापनात आंबडपाल शाळेची उत्कृष्ट कामगिरी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- २१:-* महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (पुणे) च्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या ‘शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा’ अंतर्गत बाह्य मूल्यमापनात कुडाळ तालुक्यातील आंबडपाल जि. प. पूर्ण प्राथमिक शाळेने उत्कृष्ट कामगिरी करीत राज्यस्तरावर अ श्रेणी प्राप्त केली. या यशाबद्दल जिल्ह्यातून या शाळेचे कौतुक होत आहे. शासनाच्यावतीने शाळांचा शैक्षणिक दर्जा, भौतिक सुविधा आणि गुणवत्ता तपासण्यासाठी हे मूल्यमापन करण्यात आले होते. यामध्ये आंबडपाल जि. प. प्राथमिक शाळेने राबविलेले विविध उपक्रम, विद्यार्थ्यांची प्रगती आणि शाळा व्यवस्थापन समितीचा सक्रिय सहभाग या जोरावर या शाळेने हे मानांकन मिळविले. राज्यातील मोजक्याच शाळांना हा बहुमान मिळाला असून त्यात आंबडपाल शाळेने आपले स्थान निश्चित केले आहे, अशी माहिती संजय बगळे यांनी दिली. या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि पालकांना देण्यात आले आहे. शाळेच्या या यशाबद्दल परिसरातील शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी अभिनंदन केले असून भविष्यातही अशीच गुणवत्ता टिकवून ठेवण्याचा विश्वास शाळेच्यावतीने व्यक्त करण्यात आला. शाळेने केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर अवांतर उपक्रमांतही आपली मोहोर उमटविली आहे. शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी कष्टाने फुलविलेली ‘केळीची बाग’ हे श्रमसंस्काराचे उत्तम उदाहरण ठरत आहे. ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ आणि ‘गुणवत्तापूर्ण शाळा’ हे ब्रीदवाक्य केवळ भिंतीवर न राहता ती शाळेची ओळख बनली आहे. मूल्यमापनाच्या प्रक्रियेत शाळेचे भौतिक वातावरण, मुलांची शैक्षणिक प्रगती आणि शाळा व्यवस्थापनाचा सक्रिय सहभाग या सर्व निकषांवर शाळा सरस ठरली,असे बगळे यांनी सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

