कोकणमहाराष्ट्रमुंबई

*🛑मुंबई–विजयदुर्ग रोरो सेवेला १ मार्चपासून हिरवा कंदील ; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत १ मार्चपासून मुंबई–विजयदुर्ग रोरो सेवा सुरु

*🛑मुंबई–विजयदुर्ग रोरो सेवेला १ मार्चपासून हिरवा कंदील ; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत १ मार्चपासून मुंबई–विजयदुर्ग रोरो सेवा सुरु*

 

*🛑मुंबई ते विजयदुर्ग समुद्रमार्गे ७ तासांत प्रवास; पर्यटनाला नवी गती.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मुंबई, दि- २१:-* कोकणवासीयांसाठी आणि पर्यटनप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मुंबई–विजयदुर्ग रोरो सेवा अखेर १ मार्चपासून नियमित सुरू होत आहे. भाऊचा धक्का (मुंबई) येथून थेट विजयदुर्ग पर्यंत समुद्रमार्गे प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता मुंबईहून रोरो सेवा सुटणार असून दुपारी ३ वाजता विजयदुर्ग येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात २ मार्च रोजी विजयदुर्गहून दुपारी १२ वाजता सुटणारी रोरो सायंकाळी ७ वाजता मुंबईत दाखल होईल. सुमारे सात तासांचा हा समुद्री प्रवास प्रवाशांसाठी वेगळा आणि आनंददायी अनुभव ठरणार आहे.

राज्याचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे या सेवेच्या पहिल्या फेरीत स्वतः उपस्थित राहणार असून त्यांनी प्रवासासाठी तिकीटही आरक्षित केले आहे. त्यांच्या उपस्थितीत होणारा हा शुभारंभ कोकणातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

ही सेवा महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. रोरो (Roll-on/Roll-off) सेवेच्या माध्यमातून प्रवासी तसेच वाहने समुद्रमार्गे ने-आण करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रस्तेमार्गावरील ताण कमी होऊन वेळेची बचत होणार आहे.

या उपक्रमामुळे कोकणातील पर्यटन क्षेत्र, स्थानिक व्यावसायिक आणि हॉटेल उद्योगाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मुंबई–कोकण प्रवास आता अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याने प्रवाशांकडून या सेवेचे स्वागत केले जात आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!